चाकण एमआयडीसीत दोन युवकांचा धारदार शस्त्राने खून, दुहेरी खुनाने उद्योगनगरी हादरली
महाबुलेटीन न्यूज
चाकण : औद्योगिक परिसरातील सावरदरी ( ता. खेड ) येथे दोन तरुणांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून दुहेरी खुनामुळे अवघी उद्योगनगरी हादरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नाली सूरज चव्हाण (वय २९, रा. सावरदरी, ता. खेड, जि. पुणे, मूळगाव किरोली पठार, ता. कोरेगाव, जि. सातारा ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सावरदरीगावच्या हद्दीत भक्ती अपार्टमेंट, मंगल शेटे यांच्या इमारती समोर ही घटना घडली.
आरोपी प्रदिप दिलीप भगत ( रा. सावरदरी, ता. खेड, जि. पुणे, मूळगाव वाशीम ) हा फिर्यादीच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेची छेडकाढून तिला वारंवार त्रास देत होता. तसेच महिला राहत असलेल्या घराच्या बाथरूमची खिडकीची काच फोडल्याच्या कारणानेफिर्यादीचे पती मयत सुरज नंदकुमार चव्हाण (वय २७) व त्याचा मित्र मयत अनिकेत किसन पवार (वय २४) हे दोघे आरोपीस जाबविचारण्यासाठी गेले असता आरोपी प्रदिप भगत याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले.
स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी तळेगाव येथील पवना हॉस्पिटल येथे, तर एकाला चाकण येथील ग्रामीणरुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. फरार आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ३०२ नुसार गुन्हादाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी पिंपरी–चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त परी मंडळ –१ मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्तप्रेरणा कट्टे यांनी भेट देऊन पाहणी केली.
महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील व पोलीसपथक पुढील तपास करीत आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्हा व राज्याबाहेरील कामगार कामासाठी आल्याने अशा गंभीर घटनासमोर येत आहेत. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी त्यांना भाड्याने खोली, फ्लॅट देताना त्यांची कागदपत्रे व पोलीस ठाण्यातूनचारित्र पडताळणी करून घ्यावी. ज्यामुळे अशा घटनांना व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर पोलिसांना चाप बसविण्यास मदतहोईल. यापुढे आपापल्या खोल्यांमधील भाडेकरूंची माहिती घर मालकांनी विहित नमुन्यात पोलीस ठाण्यात द्यावी, अन्यथाकायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व किशोर पाटील यांनी दिला आहे.
0000
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.