गुन्हेगारी

चाकण एम.आय.डी.सी. परिसरात मोटार सायकल चोरी करणा-या सराईत गुन्हेगाराला महाळुंगे पोलीसांनी ठोकल्या बेडया, चारदुचाक्या चोरल्याची कबुली, चारही दुचाक्या जप्त

चाकण एम.आय.डी.सी. परिसरात मोटार सायकल चोरी करणाया सराईत गुन्हेगाराला महाळुंगे पोलीसांनी ठोकल्या बेडया, चारदुचाक्या चोरल्याची कबुली, चारही दुचाक्या जप्त

महाबुलेटीन न्यूज

महाळुंगे इंगळे : चाकण एम.आय.डी.सी. परिसरात मोटार सायकल चोरी करणाया सराईत गुन्हेगाराला महाळुंगे पोलिसांनी बेड्याठोकल्या. याप्रकरणी महेश भगवान गिरी ( वय २२ वर्षे रा. मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे ) या चोरट्यास अटक करण्यात आलीआहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीचिंचवड परिसरातील मोटार सायकल चोरीवर आळा घालण्याकरिता गुन्हयांचे क्राइम मैपिंगकरुन, नाकाबंदी पेट्रोलिंग करुन गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिल्यानुसारमहाळुंगे पोलीस चौकीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर साबळे यांनी गुन्हे तपास पथक, महाळुंगे पोलीस चौकी यांना मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत क्राइम मैपिंग करुन पेट्रोलिंग सी सी टि व्ही पाहुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकरण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अंमलदारांनी वारंवार चोरी होणायाठिकाणांची पाहणी करून मोटार सायकल चोरी गुन्हे घडले तारीख, वेळ, ठिकाण पडताळणी करुन घडलेल्या गुन्हयांची काईम मॅपिंगतयार करण्यात आले, त्यानुसार विविध ठिकाणाचे सी सी टि व्ही फुटेजची पाहणी पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली.

दिनांक ११/०८/२०२२ रोजी महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, पोलीस हवालदार बिराजदार, पो.नाईकवडेकर, पो. ना. काळे, पो.शिपाई गायकवाड, पो.शि. माटे यांनी मोटार सायकल चोरीच्या अनुषंगाने सी सी टि व्हि फुटेज गुप्तबातमीदाराच्या आधारे महेश भगवान गिरी वय २२ वर्षे रा. मेदनकरवाडी ता. खेड जि. पुणे यास ताब्यात घेतले असता त्याने मोटारसायकल चोरले  असल्याची कबुली दिली. त्यास चाकण पोलीस स्टेशन अंकीत महाळुंगे पोलीस चौकी गु..नं. १२७७/२०२२ भा..वि. कलम ३७९ गुन्हयामध्ये अटक करुन न्यायालयाने पोलीस कोठडी मंजुर केल्यावर अधिक तपास केला असता त्यांनी अजुन चार मोटारसायकली चोरल्या असल्याचे सांगितले. वरील आरोपी यांनी चोरलेल्या मोटार सायकली महाळुंगे पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

  • कंपनीतील कामगारांना आवाहन 

    एमआयडीसी मधील कंपन्यामधील कामगारांना आवाहन करण्यात येते की, कामगारांनी आपल्या मोटार सायकली कंपनीच्या आवारातकंपाऊंडच्या आत योग्य सिक्युरिटी / सीसीटीव्ही निगराणी खाली पार्क कराव्यात तसेच मोटार सायकलीला मेटल टायर लॉक लावावे हॅन्डल लॉक करून पार्क कराव्यात जेणेकरून कंपनी आवारामधुन होणाया चोरीस प्रतिबंध निर्माण होईल.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीसआयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे यांचे सुचना मार्गदर्शना खाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक  ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोरपाटील, पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, सपोफौ पानसरे, पो. हवालदार राजु कोणकेरी, जयवंत शिकारे, युवराज बिराजदार, विठठल बडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे, अनिल महाजन, संतोष होळकर, शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, गणेश गायकवाड, अमोल माटे, संतोष वायकर, राजेंद्र खेडकर, राहुल मिसाळ यांनी केली आहे. पुढील तपासमहाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस हवालदार शिकारे करीत आहेत.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्राची मान्यता आणि नाफेड यंत्रणेमार्फत उपलब्ध होणाऱ्या 10 वस्तूंची विक्री शिधावाटप दूकानातून करण्यास परवानगी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय असावे, अशा पद्धतीने मुंबई, ठाण्यातील शिधावाटप यंत्रणेची पुनर्रचना – उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री अजित पवार

महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…

4 days ago

व्याजाच्या पैशांच्या वादातून हत्या..! बारामती-सोरटेवाडी हत्या प्रकरणातील आरोपीला चाकण पोलिसांनी केलं जेरबंद

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…

2 weeks ago

पत्रकारांनो सावधान.. तुम्हाला 250 कोटींचा दंड होऊ शकतो

मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…

3 weeks ago

महिलांना व्यवसायासाठी मिळणार 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज! येथे अर्ज करा Small Business Loan Apply

महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…

4 weeks ago

दुबईत खेडच्या मराठी तरुणाची व्यवसायात भरारी…

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…

4 weeks ago

This website uses cookies.