सण-उत्सव

महाळुंगे शाळेत क्रांतीकारकांच्या वेशभूषेत विद्यार्थी ट्रॅक्टर रॅली

महाळुंगे शाळेत क्रांतीकारकांच्या वेशभूषेत विद्यार्थी ट्रॅक्टर रॅली

महाबुलेटीन न्यूज

महाळुंगे इंगळे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिककेंद्रशाळा महाळुंगे येथे ध्वजारोहनाचा कार्यक्रम झाल्यावर चित्रकला, वक्तृत्व, समूहगीत वेशभूषा स्पर्धा पार पडल्या.

वेशभूषा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध व्यक्तीरेखा साकारल्या होत्या. यात छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई, येसूबाई, झाशीचीराणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सुभाषचंद्रबोस, विनायक दामोदर सावकर, हुतात्मा राजगुरु, भगतसिंग, सुखदेव भारतमाता अशा अनेक व्यक्तींच्या वेशभूषा केल्या होत्या. स्वातंत्र्यसंग्रामातील थोर व्यक्तिची माहिती होण्यासाठी विशेष वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्ध्येतील सर्व मुलांचीट्रॅक्टरमधून रॅली काढण्यातआली.

हर घर तिरंगाच्या घोषणा देत सर्व वेशभूषा धारक विद्यार्थ्यांसमवेत सरपंच मंगलताई भोसले, माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचात सदस्यामयुरीताई महाळुंगकर, अर्चनाताई महाळुंगकर,सदस्य नितीन फलके, किशोर भालेराव, मुख्याध्यापक दत्तू भालचिम, शिक्षक राहूललोखंडे सचिन नेवासकर, दिलीप शेळकंदे इतर सर्व शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झाले. रॅलीचे नियोजनउपशिक्षिका पायल अंबिके, रेखा वाघ, उज्वला आष्टगी, वंदना यादव, कल्पना जगताप, जयश्री गोरे, मनिषा मुळूक, जयश्री कातोरे, सुषमा जाधव, शितल कड, अनिता कुटे, शितल गायकवाड यांनी केले होते. हर घर तिरंगा, भारतमातेच्या घोषणा देत संपूर्ण गावातस्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाची वातावरण निर्मिती करण्यात आली. अमृतमहोत्सवाचा उत्साह प्रत्येक नागरीकाच्यामनामनात भरला होता.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 weeks ago

This website uses cookies.