महाबुलेटीन न्यूज
चाकण ( पुणे ) : बहिणीची छेड काढल्याच्या रागात सोमवारी ( दि. ६ सप्टेंबर ) सोळा वर्षीय मुलांचे अपहरण Kidnapping करून डोक्यात दगड घालून खून Murder करण्यात आला असून सदर घटनेतील आरोपी निष्पन्न झाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिली.
मुलीच्या भावासह ७ जणांचा यामध्ये समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रोहित प्रभू साहनी ( रा. झित्राईमळा, चाकण, मुळगाव समस्तीपुर, बिहार ) असे मयत मुलाचे नाव आहे. ६ सप्टेंबर दिवशी अराफत शिकीलकर याने त्याच्या मित्र मन्सूर इनामदारला रोहितकडे पाठवले.
रोहित हा एका हॉटेलसमोर बसला होता. मन्सूरने तिथून रोहितच्या दुचाकीवरून अपहरण करण्यात आले आहे. चाकण मार्केट यार्डच्या समोर पीडब्ल्यूडीच्या मोकळ्या मैदानात त्याला आणले होते. त्या मोकळ्या मैदानात अराफत आणि त्याचे आणखी ५ मित्र उपस्थितीत होते. या सर्वांनी मिळून रोहितला लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली.
तर अराफतने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने रोहितच्या डोक्यात जोरात प्रहार केला आहे. मित्र युसूफ काकरने डोक्यात दगड घातला आहे. यात रोहितची हत्या झाली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी मन्सूरला अटक केली आहे. अराफत आणि त्याच्या आणखी ५ मित्रांचा शोध सुरु आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मारहादर्शनाखाली चाकण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.