महाबुलेटीन न्यूज
घोडेगाव : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांनी घेतलेल्या सी. ए. इंटरमिजिएट परीक्षेत पुणे केंद्रातून ऋतुजा घोलप ही प्रथम आल्याबद्दल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव ता. आंबेगाव येथील प्रकल्प अधिकारी आर. बी. पंढुरे यांनी तिचे कौतुक करत सत्कार केला.
फुलवडे ता. आंबेगाव येथील अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक अविनाश घोलप यांची कन्या ऋतुजा घोलप हिने सी. ए. इंटरमिजिएट परीक्षेत ८०० पैकी ६१८ गुण मिळवून पुणे केंद्रात प्रथम क्रमांक संपादित केला. तिने आपल्या शिक्षणाची सुरुवात न्यू इंग्लिश मीडियम स्कुल घोडेगाव येथून केली. त्यानंतर तिने कुकडी व्हॅली पब्लिक स्कुल येडगाव, ता. जुन्नर येथे एस. एस. सी. परीक्षेत ९७ टक्के गुण मिळविले. पुढील शिक्षणासाठी पुणे येथील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) मध्ये शिक्षण घेऊन एच. एस. सी. परीक्षेत ९३ टक्के गुण संपादित केले. त्याचवेळी सी. ए. होण्याचे स्वप्न बाळगून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मध्ये प्रवेश घेऊन सी. ए. फाउंडेशन नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ४०० पैकी ३४६ गुण मिळवून भारतात १८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यावेळी सी. ए. इंटरमिजिएट नोव्हेंबर २०२० मधील परीक्षेत तिने भारतात ५० वा क्रमांक, तर पुणे केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असताना घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी आर. बी. पंढुरे यांनी तिचे अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ भवारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक कालेकर, विकास निरीक्षक विठ्ठल चव्हाण, राजाराम गाडेकर, शरद काळे आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
———————————————————————–
“कोरोनाच्या संकटामुळे या परीक्षा तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या. अखेर २२ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर मध्ये या परीक्षा पार पडल्या. कोरोना काळात घाबरून न जाता धाडसाने पुणे येथे राहून जिद्दीने अभ्यास करून ऋतुजाने परीक्षेला सामोरे जात हे यश मिळविले आहे. तिचे हे कार्य खरोखरचं कौतुकास्पद आहे.”
– आर. बी. पंढुरे, प्रकल्प अधिकारी, घोडेगाव ता. आंबेगाव.
———————————————————————–
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.