शैक्षणिक

महाबुलेटीन न्यूज : कोरोना काळात फी आकारल्याने पालकांची बीडीओ कडे दाद, योग्य शुल्क आकारण्याची सभापती व बीडीओंची शाळेला सूचना

महाबुलेटीन न्यूज : कोरोना काळात फी आकारल्याने पालकांची बीडीओ कडे दाद..
योग्य शुल्क आकारण्याची सभापती व बीडीओंची शाळेला सूचना

महाबुलेटीन न्यूज : कल्पेश भोई 
चाकण : कोरानाच्या काळात शाळा बंद होत्या, ऑनलाइन शिक्षण असल्यामुळे शाळेतील अनेक भौतिक सुविधांचा वापर होत नव्हता, त्यामुळे शाळांनी कम्प्युटर विभाग, प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी शुल्क वसूल करू नये तसेच शुल्क कपात करावी, अशी मागणी पालकांकडून होत होती. तर त्यातच लॉकडाऊन मुळे अनेक पालकांच्या नोकऱ्याही गेल्या, व्यवसाय ठप्प झाले. या बाबत शाळांनी फक्त शैक्षणिक शुल्क ( ट्युशन फी ) घ्यावे, असे शासनाने जाहीर केले; मात्र या निर्णयाला खाजगी शाळांनी हरताळ फासला असल्याचे चित्र खेड तालुक्यातील एका प्रतिष्ठित इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये पाहायला मिळाले.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोरोना या महामारी मुळे अनेकांच्या नोकऱ्या जाऊन व्यवसाय अगदी ठप्प झाले. या काळात कोरोनाला आळा बसावा, या हेतूने शासनाने सन 2020 – 21 या शैक्षणिक वर्षात शाळा चालू ठेवू नये व ऑनलाईन शिक्षण द्यावे, असे सांगितले असताना ही येथील पायस मेमोरियल स्कुल या या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने शासनाने मार्गदर्शित केलेल्या शैक्षणिक पद्धतीचा अवलंब न करता मनमानी कारभार करत फक्त व्हाट्सअपवर यूट्यूबच्या माध्यमातील लिंक पाठवून अभ्यास घेण्याचा प्रयत्न केला.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये कोणत्याही सुविधांचा वापर शाळेने केला नाही. याबाबत पालक संघटनेचे काही पालक संबंधित शाळेमध्ये जाऊन चालू शैक्षणिक वर्षाची फी कमी करावी किंवा फक्त शैक्षणिक वर्षाची फी द्यावी याची मागणी करण्यासाठी वारंवार गेले असता शाळेच्या मॅनेजमेंटने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता संबंधित पालकांना अपमानित करून बाहेर काढले.

याबाबत पालक संघटनांनी खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्याकडे ही दाद मागितली, मात्र त्यांनीही याबाबत कुठलेही सहकार्य न करता केवळ शाळेची बाजूच बरोबर आहे, असे सांगितले. मात्र या प्रकरणात हार मानतील ते पालक कसले. तदनंतर खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजय जोशी, विस्तार अधिकारी जीवन कोकणे, सभापती भगवान पोखरकर यांच्याकडे याबाबत गार्‍हाणे मांडले असता गटविकास अधिकारी व सभापती यांनी शाळेमध्ये येऊन शहानिशा करून याबाबतीत शाळेच्या मुख्यध्यापिका यांच्याशी पालकांनी फी संदर्भात केलेल्या तक्रार बाबत योग्य ती शालेय फी अकारावी, अशी सूचना केली. यावेळी पालक संघटनेचे शाहआलम बेग, सादिक मुलाणी, पत्रकार कल्पेश भोई, निर्मल साबळे, अतुल नाणेकर, हितेश कांकरिया, बच्चे आदी पालक उपस्थित होते.
——

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

1 day ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

3 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

4 days ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

5 days ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

1 week ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 week ago

This website uses cookies.