महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
घोडेगाव : आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना (सीटु) महाराष्ट्र राज्य यांच्या घोडेगाव प्रकल्प कार्यकारिणीची बैठक राज्य सरचिटणीस बी. टी. भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ठाणे विभागीय अध्यक्ष गणेश गावडे, ठाणे कार्यकारिणी सदस्य पांडुरंग माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन संपन्न झाली. या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.
नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी दादासाहेब सितापुरे, कार्याध्यक्ष नवनाथ भवारी, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, लक्ष्मण देवकर, विठ्ठल भुजबळ, रेणुका जाधव, संजय वाघमारे, सचिव चंद्रकांत नाईकडे, सहसचिव जे. एस. वाडेकर, किशोर खोसे, कोषाध्यक्ष धनंजय आमटे, सहकोषाध्यक्ष एस. बी. घोळवे, प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोलप, सहप्रसिद्धी प्रमुख तान्हाजी बोऱ्हाडे, डप्पडवाड सर, महिला आघाडी प्रमुख कोमल नाईकडे, प्रमुख मार्गदर्शक बी. एस. रौंधळ, सुनीता कांबळे, श्रीमती डुंबरे, के. एन. जोगदंड, एस. एस. सोनवलकर, व्ही. एस. नरसाळे, आर. एस. आंधळे, बी. एन. दरेकर, एस. ए. दहिफळे, चेंडके सर, उद्धव महाजन, संघटक एस. एस. गडगे, एस. एम. पांचाळ, के. बी. टोपे, एस. एस. बोंबले, मारुती ठोंबरे, रोडगे, एस. ए. गुंजाळ, एस. एस. शेलार, श्रीमती केडे, प्रकल्प कार्यालय प्रतिनिधी वाय. ए. खंडारे, प्रमोद पिंपळे, वर्ग चार प्रतिनिधी विजय चव्हाण, विजय सोनवणे आदींचा समावेश करण्यात आला आहे.
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी हे संघटनेचे सभासद असून संघटनेतील सर्व सभासदांचे प्रश्न व न्याय, हक्क याबाबत वेळोवेळी जाणीव जागृती करण्याचे कार्य संघटनेचे सर्व पदाधिकारी निष्ठेने करून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या तसेच समाजाच्या उन्नतीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याबाबतचा विश्वास याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन कोमल नाईकडे यांनी केले तर आभार मारूती ठोंबरे यांनी मानले.
०००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.