निधन वार्ता

पोहता येत असतानाही युवकाचा इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

पोहता येत असतानाही युवकाचा इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : इंद्रायणी नदी पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा दमछाक झाल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी ( दि. २१ मे ) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आंबी ( ता.मावळ ) येथे इंद्रायणी नदीपात्रात घडली. अनिमेश शांताराम व्होटकर (वय २०, रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ, जि. पुणे) असे पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. 

या संदर्भात रोहीत नरेश वाल्मिकी (वय २९, रा. समता कॉलनी, वराळे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. अनिमेश व्होटकर आणि त्याचा मित्र रोहीत वाल्मिकी हे दोघे शुक्रवारी दुपारी इंद्रायणी नदी पात्रात पोहण्यासाठी उतरले. एका तीरावरून नदीच्या दुसऱ्या तिराकडे पोहत जाण्याचे त्यांचे ठरले. मात्र अमिनेश व्होटकर नदीपात्राच्या मध्यभागी आला असता दमछाक झाल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मित्राने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांच्या सदस्यांनी शोध मोहीम राबवली. सुमारे दीड तासाच्या शोध मोहिमेनंतर अनिमेश व्होटकर याचा मृतदेह शोधण्यात यश आले.

विशेष म्हणजे हे दोघे मित्र नेहमी या ठिकाणी पोहण्यासाठी येत होते. आज मात्र दुर्दैवाने अनिमेश व्होटकर याचा दुर्देवी मृत्यू झाला. घटनेचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे आणि सहकारी स्टाफ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. वामन गेंगजे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 
०००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.