अध्यात्मिक

भंडारा डोंगर येथील बोगद्याच्या नियोजित आराखड्यात बदल हवा, रिंग रोडसाठी डोंगराला बोगदा पाडू नका : खासदार श्रीरंग बारणे ● भंडारा डोंगर बोगद्याला देहू संस्थान व वारकऱ्यांचा विरोध ● अध्यात्मिक व पुरातन वास्तूंना धक्का लावू नका, अन्यथा वारकरी आंदोलन उभारणार : हभप. भरतमहाराज थोरात कीर्तनकार

भंडारा डोंगर येथील बोगद्याच्या नियोजित आराखड्यात बदल हवा, रिंग रोडसाठी डोंगराला बोगदा पाडू नका : खासदार श्रीरंग बारणे
● भंडारा डोंगर बोगद्याला देहू संस्थान व वारकऱ्यांचा विरोध
● अध्यात्मिक व पुरातन वास्तूंना धक्का लावू नका, अन्यथा वारकरी आंदोलन उभारणार : हभप. भरतमहाराज थोरात कीर्तनकार

महाबुलेटीन न्यूज
देहू : पुणे जिल्ह्यात चालु असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ अंतर्गत ( एम.एस.आर.डी.सी ) पुणे ग्रामीण मध्ये प्रस्तावित असलेला ११० मी रुंदीचा रिंगरोड मावळ तालुक्यातील देहु जवळील श्री क्षेत्र भंडारा डोंगरास बोगदा करुन जात आहे, असे नियोजित आराखड्यानुसार निदर्शनास आले असुन त्यास देहु संस्थान व वारकरी यांचा तीव्र विरोध आहे.

सदरील नियोजित आराखड्यात योग्य तो बदल करण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महाराष्ट्र राज्य सरकारकडे केली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या मागणीचा व वारक-यांच्या भावनेचा विचार करुन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.

       ■ अध्यात्मिक व पुरातन वास्तूंना धक्का लावू नका, अन्यथा वारकरी आंदोलन उभारू : हभप. भरतमहाराज थोरात ( कीर्तनकार )
भौतिक विकास होत असताना संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांची साक्षात्कारभुमी श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर व
साधनाभुमी श्रीक्षेत्र भंडाराडोंगर या वारकरी सांप्रदायाच्या श्रद्धा, उर्जा व शक्तीस्थळांचे कोणत्याही स्वरुपाचे उत्खनन शासनाने करु नये. अध्यात्मिक व पुरातन वास्तूंना धक्का लावू नका, अन्यथा वारकरी आंदोलन उभारू; असा इशारा वारकरी सेवा फाऊंडेशनचे सहकार्याध्यक्ष व संतविचार धारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. भरत महाराज थोरात यांनी दिला आहे.
०००००

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

4 weeks ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.