महाबुलेटीन न्यूज : सोमनाथ नढे
पिंपरी : पुणे शहरातून जाणारा रिंग रोड हा श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथून जाणार आहे व त्यासाठी भंडारा डोंगराला बोगदा पाडण्यात येणार आहे, यास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवाभावी ट्रस्ट नढेनगर, काळेवाडी व ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे. त्यात श्री क्षेत्र देहू येथील भंडारा डोंगरावर साक्षात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वास्तव्य होते. अशा या पवित्र व वारकरी संप्रदायाला अत्यंत प्रिय असलेल्या भंडारा डोंगराला बोगदा पाडण्याचे काम म्हणजे संतांचे वास्तव्य नाकारणे असे आहे. त्याचप्रमाणे समस्त हिंदू धर्म व वारकऱ्यांच्या भावना जाणून बुजून दुखवण्यासारखे आहे. ज्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जगाला उपदेश केले त्यांचेच नामोनिशान पुसू नये.
● समस्त वारकरी संप्रदायाचा व जनतेचा या कामास प्रचंड विरोध आहे. डोंगराच्या एका दगडालाही आम्ही हात लावू देणार नाही. तरी सदरचे काम रद्द करण्यात यावे. अन्यथा या विरुद्ध तीव्र आंदोलन उभारण्यात येईल व त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला संपूर्णपणे शासनच जबाबदार असेल, असा इशारा नगरसेवक विनोद नढे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. सदरील बोगद्याचे काम रद्द करून रिंग रोडसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नगरसेवक विनोद नढे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवाभावी ट्रस्ट नढेनगर, समस्त काळेवाडी ग्रामस्थ यांनी केली.
००००
गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…
बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…
सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…
रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…
गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…
सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…
This website uses cookies.