महाबुलेटीन न्यूज
देहू : पुणे जिल्ह्यात चालु असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ अंतर्गत ( एम.एस.आर.डी.सी ) पुणे ग्रामीण मध्ये प्रस्तावित असलेला ११० मी रुंदीचा रिंगरोड मावळ तालुक्यातील देहु जवळील श्री क्षेत्र भंडारा डोंगरास बोगदा करुन जात आहे, असे नियोजित आराखड्यानुसार निदर्शनास आले असुन त्यास देहु संस्थान व वारकरी यांचा तीव्र विरोध आहे.
सदरील नियोजित आराखड्यात योग्य तो बदल करण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महाराष्ट्र राज्य सरकारकडे केली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या मागणीचा व वारक-यांच्या भावनेचा विचार करुन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.
■ अध्यात्मिक व पुरातन वास्तूंना धक्का लावू नका, अन्यथा वारकरी आंदोलन उभारू : हभप. भरतमहाराज थोरात ( कीर्तनकार )
भौतिक विकास होत असताना संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांची साक्षात्कारभुमी श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर व
साधनाभुमी श्रीक्षेत्र भंडाराडोंगर या वारकरी सांप्रदायाच्या श्रद्धा, उर्जा व शक्तीस्थळांचे कोणत्याही स्वरुपाचे उत्खनन शासनाने करु नये. अध्यात्मिक व पुरातन वास्तूंना धक्का लावू नका, अन्यथा वारकरी आंदोलन उभारू; असा इशारा वारकरी सेवा फाऊंडेशनचे सहकार्याध्यक्ष व संतविचार धारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. भरत महाराज थोरात यांनी दिला आहे.
०००००
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.