महाबुलेटीन न्यूज / दत्ता घुले
शिंदे-वासुली : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचे उपोषण व जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील जोशी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे, खेड उपविभागिय अधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले व पिंपरी-चिंचवड पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी उपोषणकर्ते प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली.
आधी काम बंद करा, मगच चर्चा करा : प्रकल्पग्रस्त शेतकरी पुण्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी पुनर्वसनाच्या मागण्यांसंदर्भात मिटींग लावून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. तोपर्यंत जलवाहिनेचे काम चालू द्या व तुमचे आंदोलन मागे घ्या, अशी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने शिष्टाई करण्यात आली. परंतु उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी ‘आधी काम बंद करा, मगच चर्चा’ असा पवित्रा घेतल्याने बैठक उधाळली.
सध्या पुणे महानगरपालिकेच्या जलवाहिनेचे काम अधिक मशिनरी लावून युद्धपातळीवर सुरू असून थोड्याच दिवसात जलवाहिनेचे काम पूर्ण होईल अशी कामाची परिस्थिती आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने समाधान कारक चर्चा किंवा तोडगा न निघाल्याने पुढील काळात आंदोलन अधिक भडकणार असल्याचे समजते.
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.