ताज्या बातम्यांसाठी पहा महाबुलेटीन न्यूज….
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : पुणे समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी काही आश्वासने दिल्यानंतर देखील सर्व मागण्यांबाबत ठोस निर्णय झाल्याखेरीज आंदोलन मागे घ्यायचे नाही या निर्धाराने मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे व त्यांच्या सहका-यांनी आज ( दि.५ सप्टेंबर ) पासून प्रशासकीय भवनासमोर सुरु केलेले बेमुदत धरणे आंदोलन कायम ठेवले आहे.
आश्रमशाळेकडील विद्यार्थ्यांचे गतवर्षीचे परीपोषण आहाराचे अनुदान त्वरित द्यावे. आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत. इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांच्यावर कारवाई करण्यात यावी या व इतर मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता सर्व संबंधितांना पूर्वसूचना देवून मखरे व त्यांच्या सहका-यांनी आजपासून हे बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले.
मखरे यांच्या पवित्र्यामुळे धाबे दणाणलेल्या समाजकल्याण विभागाच्या अधिका-यांनी त्यांना आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्याचे अनेक प्रयत्न केले. समाज कल्याण विभाग पुण्याच्या सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांनी लेखी पत्र पाठवले.
प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळाच्या सन २०१८-१९ अंतिम व सन २०१९-२० अंदाजित वेतनेतर अनुदानासाठी १ कोटी ३२ लाख ८५ हजार ७३९ रूपये, कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. परंतु तांत्रिक कारणास्तव विल पोर्टलवरुन सदर रकमेचा बी.डी.एस. काढता येत नाही. याबाबत प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण पुणे विभाग पुणे यांना कळविण्यात आले आहे. परंतु अद्याप ही सदर रकमेचा वी.डी.एस. काढता येत नाही. तो निघाल्यास आपले वेतनेतर अनुदानाचे देयक तात्काळ कोषागारात सादर करण्यात येईल.
प्राथमिक आश्रमशाळा इंदापूरचे स्वयंपाकी प्रकाश बोरकर यांचा थकबाकीचा प्रस्ताव मुख्याध्यापक, प्राथमिक आश्रमशाळा इंदापूर यांना त्रुटी पुर्ततेसाठी परत करण्यात आला आहे. परंतु अद्याप त्रुटी पुर्ततेसह प्रस्ताव अप्राप्त आहे. महिला अधिक्षिका अनिसा मुल्ला यांचा थकबाकीचा प्रस्ताव प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण पुणे विभाग पुणे यांना सादर करण्यात आला होता. तो प्रस्ताव प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त समाजकल्याण पुणे विभाग पुणे यांचे मार्फत संचालक, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सादर करण्यात आला आहे.
कनिष्ठ महाविदयालयाच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतननिश्चितीबाबत दि.१९/८/ २०२० व दि.२/९/२०२० रोजी समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. परंतु समितीमधील सर्व सदस्य उपस्थित नसल्याने समितीची बैठक झालेली नाही. समितीची बैठक तात्काळ घेवून त्यावर कार्यवाही करण्यात येईल, अशी आश्वासने या पत्रात देण्यात आली होती. आंदोलनापासून परावृत्त व्हावे अशी विनंती करण्यात आली होती.
तथापि गेली अनेक वर्षे या प्रश्नांचे घोंगडे तसेच भिजत पडलेले आहे. तीच ती आश्वासने मिळत आहेत. ठोस निर्णय झाल्याशिवाय व इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता यांच्यावर कारवाई करण्याच्या आपल्या प्रमुख मागणीची पूर्तता झाल्या खेरीज आपण आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका रत्नाकर मखरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. या संदर्भात या विभागाच्या अधिका-यांची बाजू घेवून समेट करण्यासाठी कोणत्या ही राजकीय पक्ष, संघटनेच्या नेत्यांनी आपल्याकडे येवू नये, असे
ही मखरे यांनी निक्षून सांगितले आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.