दिन विशेष

शिक्षक दिनानिमित्त कोविड सर्वेक्षणात सहभागी शिक्षकांचा इंदापूर नगरपरिषदेकडून सन्मान

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : शिक्षक दिनानिमित्त कोविड सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या १०४ शिक्षकांचा इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते मास्क, रुमाल व गुलाबाचे फुल देऊन सन्मान करण्यात आला. आज (दि.५ सप्टेंबर) भार्गव बगिच्यामध्ये हा कार्यक्रम झाला.

या वेळी बोलताना नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की, प्रत्येकाचे आयुष्य घडवण्यात शिक्षकांचे योगदान मोठे असते. वेगवेगळ्या प्रसंगी, व्यवहारात लोक शिक्षकांप्रमाणे मार्गदर्शक म्हणून कार्यरत असतात. कुटुंबाची काळजी घेऊन या कोरोना संकटावर मात करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. त्यासाठी सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांनी लोकांकरिता दिलेले योगदान अमूल्य आहे.

या वेळी डॉ. प्रदीप ठेंगल, प्रवीण धाईंजे, सुनील मोहिते, सुरेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्ताप पठाण यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष ओव्हाळ यांनी केले. तर गायकवाड यांनी आभार मानले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 26 Sep 2026

गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नवीन…

20 hours ago

MahaBulletin — 24 Sep 2026

बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पीडीसीसी…

3 days ago

MahaBulletin — 23 Sep 2026

मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 थार…

4 days ago

MahaBulletin — 22 Sep 2026

सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मामा-भाच्याची…

5 days ago

MahaBulletin — 21 Sep 2026

रविवार, २० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ जिल्हा…

6 days ago

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

7 days ago

This website uses cookies.