महाबुलेटीन न्यूज
सोमेश्वरनगर ( विनोद गोलांडे ) : बारामती तालुक्यातील प्रसिद्ध स्वयंभू सोमेश्वर मंदिर दि.११ रोजी महाशिवरात्र निमित्त भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रताप भांडवलकर व सचिव राहुल भांडवलकर यांनी दिली.
कोव्हीड १९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अनुषंगाने सोमेश्वर करंजे ता. बारामती येथील भाविकांच्या दर्शनासाठी बंद….
याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दि. ५ रोजी तहसील कार्यालयाला याबाबत पत्र पाठवले होते. तसेच बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोरोना विषाणुमुळे संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे. आणि ज्या अर्थी सोमेश्वर करंजे ता. बारामती जि. पुणे येथील स्वयंभू सोमेश्वर मंदिर हे महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग, ब वर्ग दर्जाचे तिर्थक्षेत्र असणारे सोमेश्वर मंदिर येथे दरवर्षी महाशिवरात्री दिवशी संपुर्ण महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहुन भाविक भक्त देवदर्शनासाठी येत असतात व तेथे भाविकांची हजारोच्या संख्येत गर्दी होत असते. तसेच गुरुवारी दि. ११/०३/२०२१ रोजी महाशिवरात्री असल्यामुळे महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या भाविकांमध्ये कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये, या दृष्टीने सोमेश्वर मंदिर गुरुवारी दि. ११/०३/२०२१ रोजी भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
……
शिव भक्तांनी घरी सुरक्षित राहून कुटूंबाची काळजी घ्यावी व आपल्या कुटूंबासमवेत शिवदर्शन घरीच राहून घ्यावे, असे विनम्र आवाहन ही केले.
— देवस्थान अध्यक्ष प्रताप भांडवलकर ….
—————-
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.