बापरे! ‘ते’ डॉक्टर किती रुग्णांच्या संपर्कात आलेत?

राजगुरूनगरमध्ये पाच डॉक्टर ‘कोरोना पॉझिटीव्ह’
हॉटस्पॉट बनतोय खेड तालुका
महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर : खेड तालुका  कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे.  एकाच दिवशी ४५ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत.  राजगुरूनगरमध्ये  पाच डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ‘ते’ पाच डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या प्रशासनाच्या डोकेदुखीचा विषय झाला आहे. रुग्णसंख्या पाचशेच्या पार पोहचली आहे. समूह संक्रमणाच्या उंबरठ्यावर तालुका आहे. अजूनही नागरिक पुरेशी सतर्कता बाळगीत नसल्याचे बँकांमधून चित्र दिसत आहे.
         राजगुनगर शहरामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला असून आता खाजगी डॉक्टर्सच कोरोनाग्रस्त सापडल्याने उपचारासाठी संपर्कामध्ये येणारे नागरिक व त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. प्रशासन सर्वोतोपरी काळजी घेत असून नागरिकांना लॉकडाऊन व सरकारी नियमांचे पालन करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी  घरीच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.  खेड तालुक्यात ४५ नव्या रुग्णांची भर पडली आहे.  त्यात चाकण शहरातील १२ नव्या पॉझीटीव्ह  रुग्णांचा समावेश आहे.तसेच आसपास च्या गावांमध्येदेखील कोरोनाने शिरकाव  केला आहे.  कोरोनाचे वाढते संकट पाहता समूह संक्रमनाबाबत काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
         तालुक्यात आतापर्यंत ५३७ जण कोरोना बाधित सापडले आहेत. त्यापैकी ३०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. कोरोना बधितांची आकडेवारी वाढत असली तरी उपचारा नंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे . त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला घाबरुन  न जाता योग्य ती काळजी घेण्याची गरज असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे.
admin

Recent Posts

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

1 hour ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

This website uses cookies.