आळंदीत नागरिकांची आरोग्य तपासणी करणार  : मुख्याधिकारी अंकुश जाधव

महाबुलेटिन नेटवर्क
आळंदी  : आळंदीत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. आळंदी शहर कोरोनामुक्त करण्यासाठी शासनाच्या धोरणाप्रमाणे आळंदी नगरपरिषदेच्या सर्व प्रभागातील  नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
               आळंदी शहरातील सर्व नऊ प्रभागात आरोग्य तपासणी करण्यासाठी १०८ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात १० शिक्षक अशी ९ पथके तयार करण्यात आली असून त्यांना प्रत्येक नागरिकांची वैयक्तिक रित्या आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले. यासाठी सर्व शिक्षकांना आरोग्य तपासणी करण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून मास्क, सॅनीटायजर, हॅन्डग्लोज पुरविण्यात आले आहे नागरीकांच्या शरीरातील तापमान थर्मल स्कॅनरने तपासण्यात येणार आहे,
          आळंदी शहरात डेंग्यू, चिकन गुनिया आणि इतर आजारा चे देखील या मोहीमेत तपासणी करण्यात येणार आहे.  ६० वय वर्षा पेक्षा अधिक असणारे ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब, गरोदर माता या सर्वांची सर्व्हेत नगरपरिषदेच्या वतीने नोंद घेतली जाणार आहे.णार सर्व नागरिकांनी या सर्व्हेक्षणास सहकार्य करावे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या संचारबंदी कालावधीतील प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे. शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

20 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.