महाबुलेटीन न्यूज
चाकण ( पुणे ) : अवैध शस्त्रसाठा जवळ बाळगणाऱ्या तीन जणांच्या टोळक्यापैकी दोन सराईतांना चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तर एक अट्टल गुन्हेगार फरार झाला आहे. अटक करण्यात आलेल्यांकडून तीन गावठी बनावटीच्या पिस्तुलासह सात जिवंत काडतुसे असा एकूण ७६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्रमोद ऊर्फ अंकित किशनराव भसके (वय २५, रा. चाकण), दत्तात्रय सूर्याजी कडूसकर (वय ३४, रा. पेठ पारगाव, ता. आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर अक्षय उर्फ ईश्वर गोविंदा पाटील (रा. नाणेकरवाडी, चाकण) हा फरार झाला आहे. सराईत गुन्हेगार अक्षय गोविंद पाटील व त्याचा मित्र प्रमोद किसनराव भसके यांनी विक्रीसाठी गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे आणलेले असून, त्यांच्यापैकी प्रमोद भसके हा नाणेकरवाडी येथील आळंदी फाटा येथे गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे व गुन्हे पथकासह आळंदी फाटा येथे सापळा लावला. या पथकाने प्रमोद ऊर्फ अंकित किशनराव भसके याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला पॅन्टमध्ये ठेवलेले एक असे दोन गावठी बनावटीचे पिस्तूल व अंगावरील पॅन्टच्या खिशात ४ जिवंत काडतुसे मिळून आली. प्रमोद भसके यांच्याकडे पिस्तूल व काडतूसबाबत अधिक चौकशी करता त्याने सांगितले की, मित्र अक्षय गोविंद पाटील यांच्यासह एकूण ४ पिस्तुल व काडतुसे विक्रीच्या उद्देशाने आणली होती.
त्यापैकी एक पिस्तुल व काडतुसे असे अक्षय पाटील यांच्याकडे आहे. तसेच मी दोन पिस्तुले विक्रीसाठी येथे घेऊन आलो होतो. व आम्ही १ पिस्तूल व ३ राउंड असे दत्तात्रय सूर्याजी कडुसकर यास विक्री केलेले आहे. अशी माहिती सांगितल्यावरून चाकण पोलिसांनी दत्तात्रय कडूसकर यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्या ताब्यात एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे मिळाले. वरील सराईतांकडून एकूण ३ गावठी बनावटीचे पिस्तूल व ७ जिवंत काडतुसे असा एकूण ७६ हजार ४०० रुपयांचा अवैध शस्त्र साठा जप्त करण्यात आला.
०००००
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…
महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…
This website uses cookies.