निवड/नियुक्ती

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी विवेक खांडेकर

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक मुख्यालय सामाजिक वनीकरण पुणे या पदावर विवेक खांडेकर यांची पदोन्नतीने पदस्थापना

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : मुख्य वनसंरक्षक (प्रा.), पुणे या पदावर कार्यरत राहीलेले भारतीय वनसेवेचे सन १९९५ च्या बॅचचे अधिकारी श्री.विवेक खांडेकर यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्यालय (सामाजिक वनीकरण), पुणे या पदावर पदोन्नतीने पदस्थापना झाली आहे. त्यांच्या पदोन्नतीने रिक्त झालेल्या मुख्य वनसंरक्षक (प्रा.), पुणे या पदी भारतीय वनसेवेचे सन २००२ च्या बॅचचे अधिकारी सहसचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर कार्यरत राहीलेले श्री. एस. डी. दोडल यांची पदोन्नतीने पदस्थापना झाली आहे.

वनक्षेत्रावरील अतिक्रमण निर्मूलनाच्या महत्वपूर्ण कामाबरोबरच पंढरपूर येथील तुळशी वृंदावन उद्यान, वारजे येथील नागरी वन उद्यान तसेच भांबुर्डा वन उद्यान उभारणी, माणिकडोह बिबटया निवारण केंद्राची क्षमता वाढ व सुधारणा अशी नाविन्यपूर्ण कामे श्री. विवेक खांडेकर यांच्या मुख्य वनसंरक्षक (प्रा.), पुणे या पदावरील कार्यकाळात झाली.

दि.१२/०८/२०२० रोजी श्री. एन. वासुदेवन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली वनभवन, पुणे येथे झालेल्या समारंभात वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचेकडून श्री. विवेक खांडेकर यांना निरोप देण्यात आला व श्री. एस. डी. दोडल यांचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे उप वनसंरक्षक (मानव व्यवस्थापन), नागपूर या पदी बदलीने पदस्थापना झालेल्या उप वनसंरक्षक (प्रा.), पुणे श्रीमती ए. श्रीलक्ष्मी तसेच उप वनसंरक्षक (कार्य आयोजना), कोल्हापूर या पदी पदस्थापना झालेल्या श्री. व्ही. डी. सूर्यवंशी, विभागीय वन अधिकारी यांनाही या प्रसंगी ‍निरोप देण्यात आला.
——-

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 19 Mar 2026

बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…

9 hours ago

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

2 days ago

MahaBulletin — 17 Mar 2026

पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…

2 days ago

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

8 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

8 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

9 months ago

This website uses cookies.