महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : महाराष्ट्र राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून ना. दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागल्यानंतर वळसे साहेबांच्या अभिनंदन पोस्ट पाठोपाठ खेड तालुक्यातुन आमदार दिलीप मोहिते पाटील यांना राज्याचे कामगार मंत्री म्हणून संधी मिळावी, या आशयाच्या पोस्टचा सोशल मिडियावर अक्षरशः पाऊस पडत आहे.
खेड तालुक्याने नेहमीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार साहेबांना साथ दिली आहे. माजी आमदार स्व. नारायणराव पवार यांनी सलग वीस वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले. तालुक्याला मंत्रीपद मिळावे या मुद्द्यावरुन झालेल्या फारकतीचा अपवाद वगळता त्यांनीही नेहमी पवार साहेबांनाच साथ दिली. स्व. आ. नारायणराव पवारांना मंत्रीपद न देवून खेड तालुक्याला ना. शरद पवार साहेबांनी डावलले. त्यानंतर सलग दहा वर्षे व आताची पाच वर्षे आ. दिलीप मोहिते पाटील तालुक्याचे नेतृत्व करीत आहेत. खेड तालुक्यासह आजूबाजुच्या तालुक्यातील तरुणांचे आयडॉल असलेले आक्रमक वकृत्व व प्रशासकिय अधिकाऱ्यांवर वचक असलेले नेतृत्व अशी सर्वसामान्यांत ओळख असणाऱ्या आ. दिलीप मोहितेंची चाकण औद्योगिक वसाहतीत कामगारांचा नेता अशीही ओळख आहे. त्यांनी स्थापन केलेली कर्मयोगी श्रमिक एकता कामगार संघटना अनेक कारखान्यांत कार्यरत असून कामगारांना न्याय देत व्यवस्थानासोबत बोलणी करून अधिकाधिक विक्रमी वेतनकरार करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे तालुक्यातील व तालुक्याबाहेरील कामगार वर्ग कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामगार मंत्री म्हणून आ. दिलीप मोहिते पाटील यांनाच सर्वाधिक पसंती देताना दिसत आहे. सोशल मिडियावर आ. मोहिते पाटील यांना कामगार मंत्री बनवावे म्हणून कामगार, कार्यकर्ते आणि तालुक्यातील नागरिक मागणी करीत आहेत. ही मागणी जर मंजूर झाली तर खेड तालुक्याला न्याय मिळेल, असे खेड तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांचे मत आहे.
आ. मोहितेंनी यावेळी लढविलेली विधानसभा निवडणूक ही शेवटची निवडणूक म्हणून लढवली आहे. तालुक्यातील नागरिकांनी या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देत आ. मोहितेंना निवडून दिले. खेड तालुक्याला मंत्रीपद मिळावे हा तालुक्याच्या अस्मितेचा विषय बनला आहे. त्यामुळे तालुक्याला संधी असूनही डावलले गेले, तर भविष्यात याची मोठी किंमत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला चुकवावी लागू शकते असा राजकीय अंदाज आहे.
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.