महाबुलेटिन न्युज / तुषार वहिले
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला होता, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक न लढवता स्थानिक व्यक्तीची नेमणूक करण्याची शिफारस होती. त्यामुळे अनेक भावी सरपंच व जेष्ठ, तसेच एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी अनेक नेते मंडळींकडे फिल्डिंग लावली होती. परंतु शासन निर्णय बदल झाला की शासकीय अधिकारीच प्रशासक म्हणून काम पाहणार त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा पडली.
पुणे जिल्ह्यातील 21.08.2020 अखेर मुदत ग्रामपंचायत वर प्रशासकिय अधिकारी म्हणून तालुका विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष् प्रसाद यांना देण्यात आले होते, त्यानुसार मावळ तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ५१ ग्रामपंचायतचा कारभार सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशासकीय अधिकाऱ्यांना कार्यभार सोपवण्यात आला.
प्रशासक व त्यांच्याकडील ग्रामपंचायती पुढील प्रमाणे :
बी. बी. दरवडे : साते, पाटण, महागाव, कुरवंडे, खडकाळा, नवलाख उंबरे, वेहेरगाव, ताजे, मळवली, कार्ला, साई, कुसगाव बुद्रूक.
एम. टी. कारंडे : आपटी, थुगाव, शिवणे, उकसाण, डाहुली, शिरदे, वडेश्वर, धामणे, ऊर्से, गहुंजे, आंबी, सोमाटणे, परंदवडी.
एस. बी. मेंगडे : खांडशी, वारू, अजिवली, मोरवे, कुसगाव खुर्द, आढले खुर्द, तिकोना, पाचाणे, कुसगाव पमा.
एस. जी. म्हसे : शिवली, सांगवडे, येलघोळ, बऊर, करंजगाव, चिखलसे, टाकवे बुद्रूक, दारुंब्रे.
एस. आर. वाळूंज : कशाळ, मळवंडी ठुले, नाणे, माळेगाव बुद्रूक, कोथुर्णे, खांड, घोणशेत, आढे, येळसे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.