महाबुलेटीन न्यूज
जुन्नर । आनंद कांबळे : जुन्नर (Junnar) तालुक्यातील वडगाव कांदळी येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेवर आज ( दिनांक 24 नोव्हेंबर ) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन दरोडेखोरांनी शस्त्र हातात घेऊन दरोडा टाकला. या दरोड्यात दोन लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी बँकेत व्यवस्थापक दशरथ भोर आणि महिला कर्मचारी हजर होते.
दरम्यान दोन दरोडेखोर हातात पिस्तुल घेऊन धमकावत असताना व्यवस्थापक दशरथ भोर यांनी विरोध केला असता त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली. यामध्ये बँकेचे व्यवस्थापक दशरथ भोर यांचा जागीच मृत्यु झाला. नारायणगाव आणि आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन दरोडेखोरांचा शोध सुरु आहे. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा टाकल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.