महाबुलेटीन न्यूज
चाकण : महिलेचा खून करून मृतदेह निर्जनस्थळी पुरल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 6 रोजी) उघडकीस आला आहे. मात्र, पोलिस तपासात हा खून पतीने व महिलेच्या सासऱ्याने केल्याचे उघड झाले असून चाकण पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली आहेतर दोन जण अद्याप फरार आहेत. आशा गोरक्षनाथ देशमुख (सध्या रा. बोरजाईनगर, मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ रा. श्रीगोंदा, जि. नगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
गोरक्ष बबन देशमुख (वय 35, रा. मेदनकरवाडी) असे अटक पतीचे नाव असून रोशन गजानन भगत (वय 22, रा. मेदनकरवाडी) व बबनशिवलींग देशमुख (वय 62, रा. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रोशन याचा मित्र रेवा व मुंडे ( पूर्णनावे नाहीत ) असे दोघेजण अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोरक्ष याने 29 ऑगस्ट रोजी इतर आरोपींच्या सहाय्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर चाकण आळंदी रस्त्यावरील वन विभागाच्या जंगलात तो नेऊन पुरला. पुढे त्याने स्वतःवर संशय येवू नये यासाठी पोलीसठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
पुढे गोरक्षनेच 1 ऑक्टोबर रोजी प्रेत खड्डयातून बाहेर काढले व जाळले. मात्र, पाऊस पडत असल्याने प्रेत अर्धवट जळाले. त्यानंतर त्यांनीते प्रेत फॉरेस्ट शेजारच्या तळ्यात फेकून दिले. परिसरात दुर्गंधी पसरताच पोलिसांना याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनीघटनास्थळी जाऊन पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. यावेळी गळा आवळून खून झाल्याचे तपासणी रिपोर्टमध्येयेताच पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कबुल केला.
पत्नी वरील अनैतिक संबंधाच्या संशयातून हा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तघांना अटक केली असून चाकणपोलीस पुढील तपास करत आहेत.
0000
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.