पुणे जिल्हा

आमदार दिलीप मोहितेंचे कुठं काय चुकलंय…!

 

महाबुलेटिन न्यूज : शिवाजी आतकरी
कामासाठी प्रसंगी भांडणारा आक्रमक आमदार दिलीप मोहिते पाटील यांची ख्याती आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कामे मार्गी लागत नाहीत, आमदारांच्या म्हणण्यास किंमत दिली जात नाहीत म्हणून आमदार दिलीप मोहिते पाटील यांची सटकली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून सरकारला घरचा आहेर दिला जात आहे. सिनियर आमदार असूनही आणि कामे मार्गी लागत नसल्यामुळे त्यांचा राग स्वाभाविक आहे.

खेड तालुका अलीकडे प्रांताधिकारी नियुक्तीवरून सतत ‘ट्रेनिंग’वर दिसतोय. माझ्या तालुक्यासाठी आयएएसचे ट्रेनिंगवरचे अधिकारी नकोत. पूर्णवेळ प्रांताधिकारी खेडला द्या. अशी मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आक्रमक पद्धतीने वरिष्ठांकडे केली होती. अनेक तक्रारी असणंऱ्या तहसीलदारांची बदली करावी या आणि इतर मागण्या आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अलीकडे केल्या होत्या. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाईमुळे कामे मार्गी लागत नसल्याचा आरोप त्यांचा आहे. मागणीनुसार कामे मार्गी लागणार नसतील तर राजीनामा देतो, असा इशाराच मोहिते पाटील यांनी मध्यंतरी दिला होता. आमदार मोहिते पाटलांची सटकली आणि मग वरिष्ठ नेत्यांनी त्यांची दखल घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत व विविध आरोप करीत असे अधिकारी खेड तालुक्यात नको, अशी मागणी मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तहसीलदार आमले यांच्या विराधात उपमुख्यमंत्री पवार यांना पत्र देण्यात आले होते. त्यात हजारो सातबारा दुरुस्तीची प्रलंबित प्रकरणे, गौण खनिज चोरट्यांशी लागेबांधे, खातेदारांची अडवणूक, प्रलंबित केसेस याकडे लक्ष वेधून आरोप करण्यात आले होते.

 

याचप्रमाणे खेड तालुक्याला पूर्णवेळ प्रांताधिकारी द्यावा. आयएएस दर्जाचा अर्धवेळ व ट्रेनिंगवरील अधिकारी नको. कारण जनता व अधिकारी, राजकीय नेते व अधिकारी यांच्यात समन्वय राहत नाही, कामे प्रलंबित राहतात, अशा कारणांमुळे खेडला पूर्णवेळ प्रांत अधिकारी द्यावा, अशी आमदार मोहिते पाटील यांची मागणी होती.

दरम्यान, खेड तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न, प्रकल्प या पार्श्वभूमीवर खेडला प्रशिक्षणावरील नव्हे तर अनुभवी पूर्णवेळ प्रांताधिकारी द्यावा. त्यामुळे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वय राहील, अशी भूमिका आमदार दिलीप मोहिते पाटील यांची होती. तालुक्याच्या दृष्टीने ही भूमिका योग्य आणि महत्वपूर्ण होती. असे असतानाही काही दिवसांपूर्वी आयएएस विवेक जॉन्सन यांची बदली खेड प्रांत म्हणून करण्यात आली होती. माझ्या तालुक्यासाठी पूर्णवेळ प्रांताधिकारी द्या, माझ्या तालुक्यातील कामे सांगितल्यानुसार मार्गी लागणार नसतील; तर माझा आमदारकीचा राजीनामा घ्या, असा आक्रमक पवित्रा आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी त्यावेळी घेतला असल्याचे सूत्रांकडून समजले होते. अर्थात पालकमंत्री अजित पवार यांनीही आमदार दिलीप मोहितेंच्या मागणीला उचलून धरले असून मोहिते पाटील यांचा रास्त हट्ट पुरविला. अतिशय आक्रमक पवित्रा घेतलेल्या आमदार मोहिते पाटील यांनी खेड तहसीलदार व प्रांताधिकारी नियुक्तीचा प्रश्न प्रतिष्ठेचा केला आहे. एकूणच आमदारांचा राग लक्षात घेता वरिष्ठांना त्यांची मागणी पूर्ण करावी लागेल असे दिसतेय. लवकरच खेड तालुक्यासाठी नवीन तहसीलदार व प्रांताधिकारी नियुक्त होतील, अशा एकूण मंत्रालयातील हालचाली आहेत.

 

एकूणच तालुक्यासाठी भांडणारा, आक्रमक पद्धतीची कार्यशैली असणाऱ्या सिनियर आमदारालाही काही मागण्यांसाठी तिष्ठत राहावे लागत असेल तर हा काहीसा विरोधाभास आहे. नेमकी सरकारमध्ये की विरोधामध्ये अशी भावना लोकप्रतिनिधीची होणे साहजिक आहे. बदल्यांचा विषय लोकहीतकारक असेल तर दिलीप मोहिते पाटलांचे कुठे काय चुकलंय…! असे म्हटल्यास वावगे नाही.

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.