कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. १७ सप्टेंबर २०२० ) कोरोनाचा उद्रेक : खेड तालुक्यात आत्तापर्यंतचा उच्चांक : आज २०७ रुग्ण, चाकण ला सर्वाधिक ५२ रुग्ण, चार जणांचा मृत्यू

 

राजगुरूनगर, चाकण, आळंदी व मेदनकरवाडीत आज सर्वाधिक रुग्ण,
आज नगरपरिषदेच्या तीन शहरात १०३, तर ग्रामीण भागात १०४ रुग्णांची वाढ,
एकूण रुग्णांची संख्या ५४०९,
४३७३ रुग्ण बरे होऊन गेले घरी,

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. १७ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज कोरोनाचा विस्फोट होऊन तालुक्यात नव्याने २०७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राजगुरूनगर, चाकण व आळंदी या तीन शहरात रुग्णांनी शतक पार करून सर्वाधिक १०३ रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागानेही शतक ओलांडून १०४ रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात भोसे, आंबेठाण, वडगाव पाटोळे व मेदनकरवाडी असा चार पुरुष रुग्णांचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला आहे.

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून दिलासादायक बाब म्हणजे तालुक्यात ४३७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ९११ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ५४०९ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १०३ ) : राजगुरूनगर – २१, चाकण – ५२, आळंदी – ३०,

# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण १०४ ) :
——————————–
# ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळलेली गावे :- मेदनकरवाडी – १४, शेलगाव – ७, राक्षेवाडी – ६, आंबेठाण – ५, खराबवाडी – ५,
नाणेकरवाडी – ५, मरकळ – ५, वडगाव घेनंद – ५,

# ४ रुग्ण आढळलेली गावे :- म्हाळुंगे इंगळे,

# ३ रुग्ण आढळलेली गावे :- गारगोटवाडी, कडाचीवाडी, भोसे,

# २ रुग्ण आढळलेली गावे :- चांडोली, दोंदे, खालुंब्रे, कुरुळी, ढोरे भांबुरवाडी, तुकाई भांबुरवाडी, बहुळ, काळुस, रासे.

# १ रुग्ण आढळलेली गावे :- वडगाव पाटोळे, गडद , शेलू, शिंदे, शिवे, येलवाडी, पाईट, होलेवाडी, नगरपरिषद, सातकरस्थळ, शिरोली, वाकी बुद्रुक, चऱ्होली खुर्द, चिंचोशी, धानोरे, कुरुळी, साबळेवाडी, शेलपिंपळगाव, दावडी, खरपुडी बुद्रुक, गुळाणी.

 

# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – २०७
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ५४०९

# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १२५
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ९११

# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ४३७३
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – ५२, आळंदी – ३०, राजगुरूनगर – २१, मेदनकरवाडी – १४,

 

# मयत झालेल्या व्यक्ती : ०४ ( सर्व पुरुष )
# वय ८०, रा. आंबेठाण, वायसीएम हॉस्पिटल, १२ सप्टेंबर
# वय ५०, रा. भोसे, ससून हॉस्पिटल, १५ सप्टेंबर
# वय ७५, रा. वडगाव पाटोळे, वायसीएम हॉस्पिटल, १५ सप्टेंबर
# वय ८४, रा. मेदनकरवाडी, सूर्या हॉस्पिटल, १६ सप्टेंबर

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.