कोरोना

आंबेगाव तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या १२०६

 

महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
घोडेगाव : दि. १ सप्टेंबर रोजी आलेल्या अहवालानुसार आंबेगाव तालुक्यात ६२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.

त्यामध्ये मंचर २८, घोडेगाव ९, अवसरी बुद्रुक ५, अवसरी खुर्द २, निरगुडसर १, कळंब ३, महाळुंगे पडवळ १, पिंपळगाव खडकी १, वळती २, तांबडेमळा १, मेंगडेवाडी २, निघोटवाडी १, गिरवली १, पेठ १, खडकी २, विठ्ठलवाडी २ यांचा समावेश आहे. आज दोन कोरोना बधितांचा मृत्यू झाला असून ६२ कोरोना बाधित रुग्णांची कोरोनातून मुक्तता झाल्याने डिस्चार्ज रुग्ण देण्यात आला आहे.

आजपर्यंत आंबेगाव तालुक्यातील कोरोना बाधितांची एकुण संख्या १२०६ झाली असून ७५८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित ४१२ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यातील १०४ गावांपैकी ६९ गावात कोरोना पोहोचला असून तालुक्यातील उर्वरित ३६ गावांमध्ये कोरोना अजून आलेला नाही. या गावांमध्ये महाभयंकर साथीचा शिरकाव होणार नाही. यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. तसेच या गावांमध्ये अधिक लक्ष केंद्रित करून जनजागृतीवर भर दिला पाहिजे.

सर्वच गावातील नागरिकांनी एफडीए प्रमाणित मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग याबाबतचे नियम पाळले पाहिजेत. गावागावात जनजागृतीपर मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. नागरिकांनी सार्वजनिक स्वरूपाचे सर्वच कार्यक्रम टाळावेत. शक्यतो प्रवास करूचं नये. जेवताना व नाष्टा करताना तोंडाला मास्क नसतो. त्यावेळी आपण एकमेकांशी गप्पा मारतो. त्यावेळी संसर्ग झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे तोंडाला मास्क नसताना बोलणे टाळावे. या आजाराचे गांभीर्य समजावून सांगितल्यास हा आजार रोखण्यात नक्कीच यश येईल. प्रत्येक गावात सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून व घरातून बाहेर न पडता प्रशासनाला साथ दिली पाहिजे.

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.