महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : पात्र कला शिक्षकांना ए. एम. स्केल त्वरीत देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांना सातारा येथे निवेदन देण्यात आले. जर कला शिक्षकांना ए. एम. वेतन श्रेणी ( प्रशिक्षित पदवीधर वेतन श्रेणी ) दिली नाही, तर संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कलाशिक्षकानी ए.टी.डी. नंतर ए. एम. ही शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेली आहे, अशा कला शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर वेतनश्रेणी ( ए. एम. स्केल ) देय असते. ही वेतन श्रेणी ते पास झालेल्या दिनांकापासून देण्याची तरतूद शासनाने जी आर मध्ये केलेली असताना सुद्धा अनेक वर्ष रयत शिक्षण संस्थेच्या कला शिक्षकांना त्या वेतन श्रेणी पासून वंचित ठेवण्यात आलेले आहे.
संघाचे राज्य उपाध्यक्ष किरण सरोदे, राज्य सहचिटणीस मिलींद शेलार, सुनील शिखरे उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किरण सरोदे, प्रदेश सहचिटणीस मिलींद शेलार, कोल्हापूर विभाग कला शिक्षक संघाचे सुनील शिखरे उपस्थित होते. संस्थाचालक आणि शिक्षक महासंघाचे पदाधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली, असल्याची माहिती किरण सरोदे व मिलींद शेलार यांनी दिली.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.