कोरोना

आळंदीतील १३० रुग्ण बरे होऊन घरी परतले

कोरोनामुक्त आळंदीसाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी : नगराध्याक्षा उमरगेकर
महाबुलेटीन न्यूज : अर्जुन मेदनकर
आळंदी : आळंदी शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी आळंदीत कोरोनाचे पार्शवभूमीवरील प्रशासनाचे नियमांचे पालन केल्यास आळंदी लवकरच कोरोन मुक्त होईल. मात्र यासाठी सामाजिक अंतर, मास्कचा वापर, विनाकारण बाहेर न फिरणे, बाजारात गर्दी न करता खरेदी करणे या बाबींचे पालन करण्याची गरज असल्याचे आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.
आळंदी शहरात रविवार (दि.९) एकही रुग्ण आढळून आला नाही. याशिवाय दोन रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. सध्या आळंदीत फक्त ३४ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. एकूण १७१ कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी ७ रुग्नांचे निधन झाले आहे. तर १३० रुग्ण बरे झाल्याने घरी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आळंदीत रविवारी एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. आळंदीत व परिसरातील नागरिकांनी आणखी दक्षता घेतल्यास लवकरच आळंदी शहर कोरोना मुक्त होईल, असे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे डब्यांचे व माहिती पत्रकांचे वाटप करून जनजागृती केली जात आहे. शहर स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाचे वतीने काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन घरी सुरक्षित राहून प्रशासनास सहकार्य करत नियमांचे पालन केल्यास आळंदी शहर कोरोना मुक्त होण्यास मदत होईल. शहरातील भाजी विक्रेते, व्यापारी, व्यावसायिकांनी नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे सूचना विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. यासाठी शहरात विविध पथकांचे माध्यमातून कारवाई केली जात असल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

3 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.