गुन्हेगारी

शिरोलीतील दुहेरी खुनाचा पोलिसांकडून १२ तासांत छडा

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
तिघांना अटक

महाबुलेटिन न्यूज : शिरोली ( ता.खेड ) येथे शनिवारी ( दि. ८ ऑगस्ट ) घडलेल्या दोन अज्ञात तरुणांच्या खुनातील आरोपींना राजगुरूनगर पोलिसांनी १२ तासाच्या आत जेरबंद केले असून मृतांची ओळखही पटविण्यात यश आले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात एका तरुणाच्या भावाच्या खुनात सहभाग असल्याच्या संशयातून आपल्या मित्रांच्या मदतीने या दोन तरुणांचा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू उर्फ अभिषेक उत्तम भालेराव ( वय १९), ऋषिकेश राजेंद्र वाडेकर ( वय २२ ) व निखिल अशोक शिंदे ( वय २०, सर्व रा. वाडेकरवस्ती, शिरोली, ता. खेड, जि.पुणे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर निरंजन अशोक गुरव ( वय २०, रा. पिंपळे गुरव ) व बजरंग दयानंद जाधव ( वय २२, रा. वैदवस्ती, पिंपळे गुरव, मुळगाव गठेरायपाळी, ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक ) अशी खून झालेल्या तरुणांची नावे आहेत.

शिरोली येथील खापरदरा या डोंगरावर दोन तरुणाचा खून झाल्याचे शनिवारी समोर आले होते.
या खुनाच्या कटात असलेल्या शिरोली येथील एका तरुणाने आपल्या मोबाईलच्या डीपीवर wp हि दोन अक्षरे लिहून ३०२ लिहिले होते. केवळ हाच धागा पकडून खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने या खुनाचे गूढ शोधून काढले. पिंपरी चिंचवड येथे काही दिवसांपूर्वी एका युवकाचा खून झाला होता. यातील खून झालेल्या दोघांचा या घटनेत सहभाग असल्याच्या संशयातून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहा. निरिक्षक राहुल लाड, निलेश बडाख, उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार नवनाथ थिटे, शंकर भवारी, विक्रम तापकीर, राजेश नलावडे, विजय सर्जीने, संजय नाडेकर, शेखर भोईर, विकास पाटील, शिवाजी बनकर, निखिल गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, विशाल कोठावळे, अर्जुन गोडसे, प्रवीण गेंगजे यांच्या पथकाने या खुनाचा १२ तासांत छडा लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

admin

Recent Posts

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 hours ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 day ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

3 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

6 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

This website uses cookies.