कोरोना

आळंदीतील अमृत हॉस्पिटल मधील रुग्णाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार

महाबुलेटीन न्यूज : अर्जुन मेदनकर
आळंदी : येथील अमृत हॉस्पिटल मधून कोरोनावर उपचार घेऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णास पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. इंद्रायणी क्लीनिकचे प्रमुख व आळंदी च -होली डॉक्टर्स फोरमचे अध्यक्ष संचालक डॉ. विकास पाटील, संचालक डॉ. अंबालाल पाटील आदींचे मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. उपचारानंतर सोडण्यात आलेल्या कोरोनामुक्त रुग्नांचे चेह-यावर दिसणारे समाधान हीच सेवेची पावती असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. अमृत हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळताना कोरोना मुक्त योध्द्यानी उपस्थित सर्व डॉक्टर्स, सिस्टर, मावशी, अडमिन स्टाफ यांचे यावेळी आभार मानले. यावेळी मानलेले आभार सध्याच्या नकारात्मक वातावरणात दिलासा देतात आणि कामाला उभारी देतात आणखीन ऊर्जा देतात, असे त्यांनी सांगितले.
घरी सुखरूप जाताना हॉस्पिटलच्या पायरीवर नतमस्तक होत काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रु तरळले. कोरोनाचे खडतर आव्हान पेलण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या सर्वांना यावेळी सलाम करण्यात आला. ‘सेवा परमो धर्म:’ हे सुभाषित सार्थ ठरवित याचे कोरोना मुक्त रुग्णांनी यावेळी सांगितले.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

2 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

4 days ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

1 week ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

1 week ago

MahaBulletin — 10 Jul 2026

गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…

2 weeks ago

This website uses cookies.