महाबुलेटीन न्यूज
आळंदी / प्रतिनिधी : येथील पोलिस ठाण्याचे हद्दीत दोन अज्ञात बेवारस मयत झाली असून आळंदी पोलिसांनी या बाबत माहिती दिली.
यात पोलीस शिपाई ससून पोलिस चौकीतून आळंदी पोलिसांना खबर देण्यात आली. अज्ञात अंदाजे वय ६५ वर्षे वयाची व्यक्ति २५ सप्टेंबरला २३/३० वाजता ससून रुग्णालय पुणे येथे मयत झाला. या बाबत खबर देणार यांनी सांगितले की, मुकादम नेम हरगुडे यांनी समक्ष केस पेपर सह कळविले आहे. एक अनोळखी इसम नाव व पत्ता माहिती नाही . वय अंदाजे ६५ वर्षे हा आळंदी नगरपरिषदे समोरील बस स्थानका जवळ आजारी अवस्थेत मिळून आला. त्यास ससून रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेऊन उपचारास दाखल केले असता तो मयत झाला. अज्ञात इसमाचे वर्णन डोकीस सफेद बारीक केस, पांढरी दाढी वाढलेली, नाक सरळ असे आहे. पुढील तपास पीएसआय सागर करीत आहेत.
दुसर्या घटनेत बेवारस मयत बाबत नवनाथ भांडवलकर रा केळगाव ता. खेड , जि. पुणे यांनी आळंदी पोलिस ठाण्यात खबर दिली. अनोळखी पुरुष अंदाजे वय ६० वर्षे २६ सप्टेंबर २०२० रोजी इंद्रायणी नदीचे पाण्यात इंद्रायणी नदीचे पश्चिम बाजूला पाण्यात मिळून आला. या अज्ञात मयत व्यक्तीचे वर्णन दाढी वाढलेली, डोकीस केस नाही असे आहे. अज्ञात इसम मयत झाला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार विजय चासकर करीत आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.