महाबुलेटिन न्यूज नेटवर्क : शिवाजी आतकरी
महसूल खात्यातील वीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांची खेडला बदली झाली. बहुचर्चित राहिलेली ही बदली अखेर झाली असून सध्याचे प्रांताधिकारी संजय तेली यांची पुणे येथे कुळकायदा शाखेत वर्णी लागली आहे.
खेडला अलीकडे आयएएस अधिकारी नियुक्त करण्याची परंपरा सुरू झाली होती. त्यातूनच आयुष प्रसाद, विवेक जॉन्सन यांची नियुक्ती येथे करण्यात आली होती. आयएएस केडरचे अधिकारी व सर्वसामान्य खातेदार तसेच नेते मंडळी यांच्यात समन्वय राहत नाही, असे अधिकारी ट्रेनिंगवर असतात त्यामुळे त्यांचा अनुभव कमी असतो, कामे रखडतात इत्यादी कारणांमुळे खेडला प्रांताधिकारी हा आयएएस नको. अशी भूमिका आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी घेतली होती. त्यामुळेच विवेक जॉन्सन यांची नियुक्ती होऊनही त्यांनी खेडला पदभार न स्वीकारता त्यांची पुनर्रबदली झाली. यात आमदार दिलीप मोहिते यांनी वरिष्ठ नेत्यांकडे आक्रमक भूमिका घेतली. यात त्यांना यशही आले.
या पार्श्वभूमीवर खेडला कोण प्रांताधिकारी येणार याबद्दल दोन महिने चर्चा सुरू होती. विक्रांत चव्हाण यांच्या नियुक्तीने या प्रकरणावर अखेर पडदा पडला. एक अनुभवी आणि कर्तव्यतत्पर शिस्तप्रिय अधिकारी अशी चव्हाण यांची महसूल खात्यात प्रतिमा आहे. विक्रांत चव्हाण खेडचे प्रांताधिकारी म्हणून सोमवारी पदभार स्वीकारतील, असे समजते.
◆ विक्रांत चव्हाण उपजिल्हाधिकारी
● नोव्हेंबर 2015 ते मे 2018 उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना पुणे येथे कार्यरत.
● सप्टेंबर 2018 ते आॅक्टोबर 2019 प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूर येथे कार्यरत.
● मार्च पासून कोरोना कामकाज साठी जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा Epidemic act अंतर्गत कार्यरत हिते.
● तत्पूर्वी पुणे, सातारा, अलिबाग येथे विविध जबाबदारीच्या पदांवर काम केले आहे.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.