महाबुलेटीन न्यूज : अर्जुन मेदनकर
आळंदी : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आळंदी शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने महिला मोर्चाचे विशेष सहकार्याने रक्षाबंधन पर्व अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आले. यावेळी खास ‘रक्षाबंधन उपक्रम’ राबवित कोविड योद्धा डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस तसेच गरजू लोकांसाठी अन्नदान वाटपाचे कार्य करणारे विविध मान्यवरांना कोविड योध्दा गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.
यात नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, नगरसेवक सचिन गिलबिले, भाजपचे गटनेते पांडुरंग वहीले, नगरसेवक सागर बोरुंदिया, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, दिनेश घुले, आळंदी पोलिस स्टेशन, नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी, आरोग्य विभाग, प्रशासकीय सेवेतील अधिकारी, लाॅकडाऊन काळात विशेष सेवारत पत्रकार अर्जुन मेदनकर, सचिव अजित वडगांवकर, प्रल्हाद भालेकर, रेणुकादास पांचाळ, प्रतिबंध क्षेत्रात जनसेवेचे काम करणारे चारुदत्त प्रसादे, हभप. विष्णू महाराज केंद्रे अशा विविध मान्यवरांना कोविड योद्धा गौरवपत्र देऊन भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा उमाताई खापरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरसेवक सागर भोसले, प्रल्हाद भालेकर, विलास पवार, मच्छिंद्र शेंडे, जालिंदरा भोसले, रेणुकादास पांचाळ आदींचा सन्मान करण्यात आला. आळंदी भाजपचे अध्यक्ष किरण येळवंडे, नगरसेवक सागर भोसले, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, भाजप किसान मोर्चाचे चिटणीस संजय घुंडरे, नगरसेविका श्रीमती रुक्मिणी कांबळे, शैला मोळक, संगिता जगताप, मालती शिंदे, कोमल काळभोर, उपाध्यक्ष नाना उर्फ बंडू काळे, प्रमोद बाफना, आकाश जोशी, माऊली बनसोडे, भागवत काटकर आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी उपक्रमासाठी विशेष परीश्रम घेतले.
—
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.