महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
चाकण ( जि. पुणे ) : ह.भ.प. सौ. सुप्रियाताई साठे ठाकुर यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी महिला अध्यात्मिक उन्नती विभाग सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी निवड केली आहे. ही संघटना संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार व जोपासना करण्याचे कार्य करीत आहे.
ह.भ.प. सौ. सुप्रियाताई साठे ठाकुर या उच्चशिक्षित असुन त्यांनी B.sc ( microbiology ) आणि MBA ( HR ) हे शिक्षण पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत युवा किर्तनकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. वयाच्या 8 व्या वर्षापासून गेली 20 वर्षे त्यांनी महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यात 5000 हुन अधिक किर्तने केली आहेत, त्याचप्रमाणे गेली 12 वर्षे त्या श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात विशेषतः महिलांसाठी श्री संत जिजाबाई महिला प्रासादिक दिंडी ही स्वतंत्र ‘महिलांची दिंडी’ चालवतात. त्यात दरवर्षी 500 हून अधिक महिलांचा समावेश असतो. त्यांच्या या सर्व कार्याची अखिल भारतीय वारकरी मंडळाने दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.