महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : येथील चक्रेश्वर स्मशानभूमी मधील विद्युत शवदाहिनी चालू करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्याकडे करण्यात आली आहे.
येथील उद्योगपती कै. शंकर दामोदर कड यांच्या स्मरणार्थ कड परिवार व रोटरी क्लब व इतर दात्यांनी दीड वर्षांपूर्वी चाकण नगरपरिषद हद्दीतील चक्रेश्वर स्मशानभूमीत लाखो रुपये खर्च करून विद्युत शवदाहिनी बसवली आहे. अनेकदा नगरपरिषदेकडे सर्वसामान्य नागरिकांनी मागणी करून देखील चालू केलेली नाही. सध्या कोरोनाने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले असून त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीत विद्युत शवदाहिनीची प्रचंड गरज असताना मृत व्यक्तीस पिंपरी-चिंचवड हद्दीत न्यावे लागत आहे, त्यामुळे नातेवाईकांची गैरसोय होऊन मृतदेहाची हेळसांड व कुचंबणा होत आहे. त्यामुळे हि विद्युत शवदाहिनी ताबडतोब चालू करावी अशी मागणी खेड तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांना २ सप्टेंबर २०२० रोजी देण्यात आले आहे. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष ऋषिकेश झगडे, नगरसेवक प्रवीण गोरे, शिवसेना शहर प्रमुख महेश शेवकरी, सतीश मंडलिक, पांडुरंग गोरे, शेखर पिंगळे, कैलास जाधव आदी उपस्थित होते.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.