[सुप -धान्य पाखडण्याचे.(खानदेशी बोली भाषा)]
{अहिरानी मायबोली}
अरे सुपडं सुपडं
फडफड पाखडस
काचा कुचा नि काचोया
बठ्ठ्या बाहेर फेकस ॥धृ॥ ( बठ्ठ्या~सगळ्या, फेकस~फेकतो )
खडा बारिक सारिक
कसा मांगेच ठेवसं (मागेच, ठेवतो)
दाना गहू बाजरीना
ताट मझार टाकसं ॥१॥ ( मधे, टाकतो )
उनं कथाईन ग्यान (आलं, कोठून, ज्ञान)
तुले कोन शिकाडस (शिकवतो)
नही जातना पातना (जातीचा पातीचा)
काम आम्हना पडस ॥२॥ (आमच्या पडतो)
अरे आम्हना करता
सदा झिंजसं झिंजसं (झिजतो)
नही किदरसं तरी (कंटाळतो)
कोपराम्हाच पडसं ॥३॥ (कोपर्यात)
तुन्हा बिगर आडसं (शिवाय, आडते)
याद तव्हयच येस (तेंव्हाच, येते)
नही तर सांग तुले
कोन कव्हयं देखसं ॥४॥ (केंव्हा,पाहतो)
काम पुरता मामाले
आठे जग वयखसं (इथे, ओळखते)
जग दुनिया नही रे
तुन्हा सारखं शिकसं ॥५॥ (शिकते)
– निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
——– ——– ——–
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.