महाबुलेटीन न्यूज l आनंद थोरात
पुणे, दि.3 : निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे निर्देश शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिले.
शिरूर लोकसभा मतदार संघांतर्गत आंबेगाव तहसील कार्यालयात आयोजित क्षेत्रीय अधिकारी, मतदानस्तरीय अधिकारी, क्षेत्रीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार संजय नागटिळक उपस्थित होते.
श्री.मोरे म्हणाले, लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी दक्ष रहावे. मतदार यादीशी संबंधित कामे वेळेवर करण्यात यावी. निवडणूक विषयक कामकाजाचे प्रशिक्षणाचे योग्यरितीने आयोजन करण्यात यावे. प्रशिक्षणात मतदान प्रक्रीयेसंबंधी सूक्ष्म बाबींचा समावेश करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.
बैठकीला निवडणूक शाखा नायब तहसीलदार सचिन वाघ, पॉलिटेक्निक कॉलेज अवसरी प्रा. बांदल, सतीश कांबळे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकारी, मतदानस्तरीय अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्ट्राँग रुम परिसराची पाहणी
निवडणूक निर्णय अधिकारी श्री.मोरे यांनी बैठकीनंतर अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रस्तावित स्ट्राँग रुम परिसराला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली. यावेळी अवसरी खुर्द येथील काही मतदान केंद्रांनाही त्यांनी भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला.
गोहे बु. येथे मतदान जनजागृती
आंबेगाव तालुक्यातील पाडळवाडी गोहे बुद्रुक येथे मतदान जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना मतदान प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली व मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. नागरिकांकडून मतदान करण्याविषयी संकल्प पत्र भरून घेण्यात आले.
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…
महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…
This website uses cookies.