गुन्हेगारी

७ लाख ३० हजार रुपयांची वाळू कारवाई,इंदापूर पोलीसांची दणकेबाज कामगिरी

महाबुलेटीन नेटवर्क / शैलेश काटे
इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रात गंगावळण गावच्या हद्दीत अवैध वाळू उपसा करणा-या तीन बोटी व त्यामधील २६ ब्रास वाळू असा एकूण ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पकडून इंदापूर पोलीसांनी त्यास जलसमाधी दिली. पळून गेलेल्या चौघा अज्ञात इसमांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायणराव सारंगकर, सहा. पो. निरीक्षक गणेश लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शंकरराव वाघमारे, पोलीस कर्मचारी काका शामराव पाटोळे यांनी मंगळवारी (दि.२८ जुलै) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. शनिवारी (दि.३० जुलै) गुन्ह्याची नोंद करण्यात झाली. पाटोळे यांनीच या संदर्भात फिर्याद दिली आहे.
सविस्तर हकीकत अशी की, दि.२८ जुलै रोजी इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगावळण गावानजीक उजनी धरणाच्या जलाशयात काही इसम बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करीत असल्याची माहिती सहा.पो.निरीक्षक गणेश लोकरे यांना मिळाली. त्यांनी हवालदार शंकरराव वाघमारे व पोलीस कर्मचारी काका पाटोळे व पंचांना बोलावून ती माहिती दिली. सरकारी वाहनाने सर्वजण गंगावळण येथे पोहोचले. तेथून एक लहान बोटीने जलाशयातील गुन्ह्याच्या ठिकाणी गेले. तेथे चार बोटी वाळूउपसा करीत असताना त्यांना मिळून आल्या.
तेथे पोहोचेपर्यंत त्या बोटीतील इसम बोटी व सेशन घेवून पळून जावू लागले. पोलीस जवळ येत असल्याचे दिसल्यानंतर त्या इसमांनी चार पैकी एक १ बोट घेवून पलायन केले. ते पळून गेल्यानंतर तीन बोटीं व त्यामध्ये  सापडलेला २६ ब्रास वाळू हा मुद्देमाल वाहून नेण्यास त्या बोटींमध्ये डिझेल व इतर साधन नसल्याने त्या बोटी पोलीसांनी वाळूसह पाण्यामध्ये जागीच पाण्यामध्ये बुडवून टाकल्या. अज्ञात इसमांविरुध्द इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार वाघमारे पुढील तपास करत आहेत.
—————————————————
● आरोपींविरुध्द भा.द.वि.कलम ३७९,३४ गौण खनिज अधिनियम १९५७ चे कलम २१,४,पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
● बुडवण्यात आलेल्या मालाचा तपशील :
———–
२ लाख ५० हजार रुपये – एक बोट त्यासोबत एक लहान सेक्शन बोटीमध्ये अंदाजे दहा ब्रास वाळु प्रत्येक ब्रास किंमत पाच हजार रुपये.
२ लाख ४०हजार रुपये – एक बोट त्यासोबत एक लहान सेक्शन बोटीमध्ये अंदाजे आठ ब्रास वाळु प्रत्येक ब्रास किंमत पाच हजार रुपये.
२ लाख ४० हजार रुपये – एक बोट त्यासोबत एक लहान सेक्शन बोटीमध्ये अंदाजे आठ  ब्रास वाळु प्रत्येक ब्रास किंमत पाच हजार रुपये.
● एकूण ७ लाख ३० हजार रुपये.
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.