कोरोना

आंबेगाव तालुक्यामध्ये एका आठवड्यामध्ये एक हजार बेडची व्यवस्था

महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
मंचर : आंबेगाव तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये  सातत्याने वाढ होत आहे.या  पार्श्वूमीवर  रूग्णांसाठी हॉस्पिटलपासून तज्ञ डॉक्टर, कर्मचारी, व्हेंटिलेटर, आॅक्सिजन तसेच एक हजार बेडची   व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व यंत्रणांनी सुसज्ज  कोविड सेंटरची  उभारणी भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पीटल मंचर येׅथे  करण्यात आली आहे.कोविड रूग्णालय व शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी खुर्द येथील कोविड सेंटरची पाहणी व उद्घाटन राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते  करण्यात आले.   यापुर्वी कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांवर तालुक्यातच उपचार होत होते मात्र गंभीर कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी जावे लागत  होते; मात्र आता  या रूग्णांवर देखिल कोविड सेंटर मध्ये उपचार केले जाणार आहेत.
भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पीटल येथे लक्षणे असलेले कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण ठेवले जाणार आहेत.  शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी खुर्द येथे लक्षणे नसलेले कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  तसेच गृह विलगीकरणात असलेल्या  नागरिकांना वैद्यकिय सेवा देखिल दिली जाणार आहे. तसेच  आपण कोणत्या पदावर आहोत हे महत्वाचे नसून आपण काम करताना समाजाला आपण काय देतो हे फार महत्वाचे आहे,  मोठया पदांवर काम करताना सकारात्मक विचार ठेवून समाज व सामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदु मानून काम करा, तरच खरे कामाचे सामाधान मिळेल असे मार्गदर्शन दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी  केले.
यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पुणे जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे,  तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे, पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, शासकिय अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंत, डॉ.नंदनवार तसेच इतर आरोग्य कर्मचारी यावेळी  उपस्थित होते .
admin

Recent Posts

MahaBulletin — 23 Sep 2026

मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 थार…

55 minutes ago

MahaBulletin — 22 Sep 2026

सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मामा-भाच्याची…

1 day ago

MahaBulletin — 21 Sep 2026

रविवार, २० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ जिल्हा…

2 days ago

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

3 days ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

1 week ago

This website uses cookies.