कोरोना

काही सकारात्मक : दोन दिवस कोरोना रुग्णांसोबत….

कोविड सेंटर मध्ये कोरोना बाधीत रुग्णांची सेवा करणारे खेड तालुक्यातील पहिले प्राथमिक शिक्षक
कोरोना रुग्णांसोबत प्रत्यक्ष त्यांनी कथन केलेला अनुभव..
महाबुलेटीन नेटवर्क / हनुमंत देवकर
नमस्कार, मी गणेश पिराजी गोरे, प्राथमिक शिक्षक, रा. चाकण
“कोविड १९ सेवा कार्य कोविड केअर सेंटर ( c c c ) म्हाडा म्हाळुंगे या ठिकाणी माझी कक्ष अधिकारी म्हणून नेमणूक झाली. आठवड्यातून दोन दिवस सेवा असा आदेश होता. पहिल्या दिवशी तिथे गेल्यावर मनात धाकधूक होती, परंतु तेथील डॉक्टर, परिचारिका यांना सेवा करताना पाहून मनातील भीती केव्हा निघून गेली ते समजले देखील नाही. डॉक्टर व परिचारिका यांनी काळजी कशी घ्यावी, रुग्णाच्या जवळ जायचे, किती लांब थांबायचे हे समजाऊन दिले. डॉक्टरांनी पी पी ई किट कशी वापरायची, तिची विल्हेवाट कशी लावायची याची व्यवस्थित माहिती दिली.
वाडा पी एच सी चे डॉक्टर, त्यांचे सोबत सहकार्य करणारा एक सेवक आणि मी असे आम्ही तिघे जण निघालो रुग्नभेटीसाठी. औषधाचा भला मोठा खोका बरोबर घेतलेला. बाराव्या मजल्यावरून सुरुवात केली. प्रत्येक मजल्यावर चार रूम. प्रत्येक रुममध्ये चार ते पाच रुग्ण. प्रत्येक रूमचे दर बंद. आमच्या सोबतचा सेवक दार वाजवायचा. काही ठिकाणी पटकन दार उघडले जायचे, तर काही ठिकाणी उशीर व्हायचा. तरी देखील डॉक्टर न रागवता सर्वांची प्रेमाने विचारणा करायचे. रुग्णाच्या तक्रारी समजून घेऊन त्यांना तशा प्रकारची औषधे डॉक्टर द्यायचे. हे सर्व करत असताना योग्य ते सामाजिक अंतर राखले जात होते. स्वत:ची काळजी, सोबतच्या व्यक्तीची काळजी अशी दुहेरी कसरत डॉक्टरांना तेथे करावी लागत होती. कोणाला काही अडचण आहे काय हे विचारून लगेचच निवारण करण्याचा प्रयत्न डॉक्टर करत होते. रुग्णाची नावे लिहिणे, कोणती रूम रिकामी आहे, कोणत्या रूमध्ये किती रुग्ण आहेत, त्याची नोंद करणे ही कामे मी करत होतो. तब्बल साडे चार तास, बारा मजले, प्रत्येक मजल्यावरील चार रुम्सची भेट असे करत करत आमचा चमू पहिल्या मजल्यावर येऊन विसावला.
शेवटी पी पी ई कीट काढून तिची योग्य ती विल्हेवाट लावली. डॉक्टरांसोबत अहवाल तयार केला. अशाप्रकारचा एक आगळावेगळा अनुभव मिळाला. कोविड सेंटर वरील सुविधा खरोखरच कौतुकास्पद आहेत. जेवण, चहा-नष्टा, निवास, औषधे, मेडिकल तपासणी अशा सर्व सोयी तेथे मोफत आहेत. मलाही येताना तेथील डॉक्टरांनी Vitamin C चे  Imun Cee chewable tablets and Multiplex M या औषधांचा कोर्स दहा दिवस करायला दिला.”
– श्री गणेश गोरे उपशिक्षक  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरेगाव केंद्र आव्हाट तालुका खेड जिल्हा पुणे
admin

Recent Posts

MahaBulletin — 23 Sep 2026

मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 थार…

2 hours ago

MahaBulletin — 22 Sep 2026

सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मामा-भाच्याची…

1 day ago

MahaBulletin — 21 Sep 2026

रविवार, २० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ जिल्हा…

2 days ago

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

3 days ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

1 week ago

This website uses cookies.