कोरोना

पुणे विभागातील 38 हजार 584 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित  64 हजार 914 रुग्ण : : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे विभागातील  38 हजार 584  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 64 हजार 914 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 24 हजार 444 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1  हजार 886 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 786  रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.44 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.91  टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील  53 हजार 450 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 32  हजार 975 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 19 हजार 127 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 13 हजार 235 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 41 व पुणे कॅन्टोंन्मेंट 237, खडकी विभागातील 47 , ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 475, जिल्हा शल्य चिकीत्सक  यांच्याकडील  92  रुग्णांचा समावेश आहे.
              पुणे जिल्हयात  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 999, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 206  व पुणे कॅन्टोंन्मेंट 29, खडकी विभागातील 23, ग्रामीण क्षेत्रातील 62, जिल्हा शल्य चिकीत्सक  यांच्याकडील  29 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 556 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.69 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.52  टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 239 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 404, सातारा जिल्ह्यात 273, सोलापूर जिल्ह्यात 362, सांगली जिल्ह्यात  64 तर कोल्हापूर जिल्ह्यात 136 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2  हजार 551  रुग्ण असून 1  हजार 307  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार 165 आहे. कोरोनाबाधित एकूण 79  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील  5 हजार 627 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 869  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  2  हजार 385  आहे. कोरोना बाधित एकूण 373 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 9 रुग्ण असून 434 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.                      ॲक्टीव रुग्ण संख्या 542 आहे. कोरोना बाधित एकूण 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 2  हजार 277 कोरोना बाधीत रुग्ण असून 999  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 225 आहे. कोरोना बाधित एकूण 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण  3 लाख  15 हजार  298  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी   3 लाख 12 हजार 368  नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 930 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2  लाख 46  हजार 730 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.
( टिप :- दि. 20 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
admin

Recent Posts

MahaBulletin — 23 Sep 2026

मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 थार…

22 minutes ago

MahaBulletin — 22 Sep 2026

सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मामा-भाच्याची…

1 day ago

MahaBulletin — 21 Sep 2026

रविवार, २० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ जिल्हा…

2 days ago

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

3 days ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

1 week ago

This website uses cookies.