महाबुलेटीन न्यूज । आनंद कांबळे
जुन्नर, दि. २८ ऑगस्ट : भिंत अंगावर पडूनही युवकांच्या तत्परतेने एकाच कुटुंबातील ६ ही सदस्य आश्चर्यकारक रित्या वाचले आहेत. जुन्नर मधील रविवार पेठ येथील ग्रामदैवत सिद्धिविनायक मंदिराजवळ काल रात्री अंदाजे साडेआठ नंतर ही घटना घडली.
रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर निवांत बसले असता सदर कुटूंबीयांवर भिंत कोसळून सर्व कुटुंबच भिंतीखाली गाडले गेले. भिंत कोसळल्याचा आवाज ऐकून सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश जोगळेकर, अरुण शिंदे, अनिल सावंत, व्यावसायिक बंडू कर्पे, मिलिंद झगडे, अभय पाठक, भागेश गाडेकर, महेश घोडेकर, हर्षवर्धन कुर्हे, मंदार ढोबळे तसेच रविवार पेठेतील इतर युवक कार्यकर्ते यांनी त्वरित मातीचा ढिगारा बाजूला करून सदर कुटुंबाला बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथे हलविण्यात आले. युवकांनी दाखवलेल्या तत्परतेचे जुन्नर परिसरामध्ये कौतुक होत आहे. हे कुटुंब परप्रांतीय असून उदरनिर्वाह साठी ५ ते ६ वर्षांपासून याठिकाणी राहत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
विनीत सहानी वय ४० वर्षे, सौ. शोभा सहानी वय ३५, प्रतिक्षा वय ११, श्रेया वय १०, श्वेता वय ५ व विवेक १८ महिने ( सर्वजण राहणार संत कबीरनगर, उत्तरप्रदेश ) अशी अपघातातून वाचलेल्या कुटुंबियांची नावे आहेत.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.