महाबुलेटीन न्यूज
चाकण : बिरदवडी ( ता. खेड ) येथील यात्रा कमिटीचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व इलेक्ट्रिकल क्षेत्रात शून्यातून विश्व निर्माण करणारा उद्योजक संजय राजाराम मुंगसे ( वय ४६ ) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. सतत हसतमुख, अतिशय मितभाषी, मनमिळावू, नम्र व सर्वांना सहकार्य करणारा, सेवाभावी वृत्ती असा स्वभाव असल्याने चाकण पंचक्रोशीत, नातेवाईक व मित्र परिवारातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक काळुरामशेठ कड यांचे ते भाचे, उद्योजक सुनील वाळुंज व अनंतकृपा पतसंस्थेचे कर्मचारी संतोष वाळुंज यांचे ते मावस बंधू, उद्योजक दत्तात्रय साठे यांचे ते साडू, तर सामाजिक कार्यकर्ते विजय मुंगसे यांचे ते धाकटे बंधू होत. संजय यांच्यावर खासगी रुग्णालयात मागील दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते. आज अचानक त्यांची प्राणज्योत मालवली. बिरदवडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
——
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.