महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
यवत : येथील सेवा रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य झाले असून या रस्त्यावर सर्व प्रकारच्या लहान-मोठ्या वाहनांची वाहतूक होते. यवत हद्दीत सेवा रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडले आहेत. पाटस येथील टोल कंपनी प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणच्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मागील काही दिवसात या खड्डयामुळे दुचाकी स्वरांचे लहान अपघात झाले आहेत. यामध्ये एक पशुवैद्यकीय डॉक्टर मयत झाले आहेत.
यामुळे पुढील काळात या मार्गावरील खड्ड्यांमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टोल प्रशासन वार्षिक जमा खर्चात वर्षाकाठी महामार्ग देखभाल व दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. पण सेवा दुरुस्ती खर्च योग्य प्रकारे केला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सेवा रस्त्याचे काम या कंपनीकडे आहे. या मार्गाची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी पाटस टोल प्रशासनाकडे असूनही रस्ता दुरुस्ती करत नाही. यवत येथे मोठ मोठे खड्डे झाले असून सेवा मार्गावर अद्याप दुरुस्ती झाली नाही. दुरुस्तीच्या दर्जाकडे डोळे झाक केली असल्याने वाहन चालक व नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. टोल प्रशासन मार्गावरील वाहन चालकांकडून टोल वसुली करताना या सुविधांचा टोल कंपनीला विसर पडलेला दिसत आहे. संबंधित कंपनी व अधिकाऱ्यांनी सेवा रस्त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती व प्रवाशांना सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.