महाबुलेटिन न्यूज नेटवर्क / शिवाजी आतकरी
राजगुरूनगर : महाराष्ट्राचा उत्सव असणारा गणेशोत्सव यंदा अटी आणि शर्तींसह असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आखून दिलेल्या नियमावलीच्या अधीन राहूनच हा उत्सव साजरा करायचा आहे.
यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाने दिले आहे. यावर्षी गणेशोत्सवास उत्सवी स्वरूप देण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
गणेशमूर्ती सार्वजनिक मंडळात चार फुटांपेक्षा जास्त नसावी. घरगुती मूर्ती दोन फूट असावी. मूर्ती शक्यतो शाडू मातीच्या असाव्यात. सामाजिक अंतराचे पालन या काळात व्हावे. आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जावे. दर्शनासाठी व्हिडीओ काढून अधिकाधिक सोशल मीडियाचा वापर केला जावा.
हार, नारळ, फुले यांची दुकाने गणेश मंडळाजवळ लावता येणार नाही. विसर्जन मिरवणुकीवर यंदा बंदी असणार आहे. सुरक्षितता कारणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे मंडळांनी बसवावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारे उत्सवी स्वरूप न देता गणेशोत्सव साधेपणाने साजरा व्हावा, यासाठी प्रशासन सतर्क आहे.
——–
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.