पुणे जिल्हा

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी व अधिकारी यांच्यातील बैठक उधळली, आंदोलन भडकण्याची चिन्हे

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी व अधिकारी यांच्यातील बैठक उधळली, आंदोलन भडकण्याची चिन्हे,
मीटिंग घेऊन योग्य निर्णय घेऊ, तोपर्यंत आंदोलन मागे घेऊन जलवाहिनीचे काम चालू करण्याची अधिकाऱ्यांची मागणी
आधी काम बंद करा, मगच चर्चा : प्रकल्पग्रस्तांची मागणी

महाबुलेटीन न्यूज / दत्ता घुले
शिंदे-वासुली : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचे उपोषण व जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील जोशी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे, खेड उपविभागिय अधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले व पिंपरी-चिंचवड पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी उपोषणकर्ते प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली.

आधी काम बंद करा, मगच चर्चा करा : प्रकल्पग्रस्त शेतकरी                               पुण्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी पुनर्वसनाच्या मागण्यांसंदर्भात मिटींग लावून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. तोपर्यंत जलवाहिनेचे काम चालू द्या व तुमचे आंदोलन मागे घ्या, अशी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने शिष्टाई करण्यात आली. परंतु उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी ‘आधी काम बंद करा, मगच चर्चा’ असा पवित्रा घेतल्याने बैठक उधाळली.

सध्या पुणे महानगरपालिकेच्या जलवाहिनेचे काम अधिक मशिनरी लावून युद्धपातळीवर सुरू असून थोड्याच दिवसात जलवाहिनेचे काम पूर्ण होईल अशी कामाची परिस्थिती आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने समाधान कारक चर्चा किंवा तोडगा न निघाल्याने पुढील काळात आंदोलन अधिक भडकणार असल्याचे समजते.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.