Mahabulletin News / महाबुलेटीन न्यूज
Bank Account Ban : बँकिंग सुविधेचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. घरातील लॉकर ऐवजी बँकेत मोठी रक्कम ठेवणे सुरक्षित आणि फायदेशीर मानले जाते. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे किमान एक तरी बँक खाते असेल, तर नोकरदार लोक एकाधिक खातीही उघडतात. परंतु कालांतराने लोकांनी काही बँक खाती वापरणे बंद केल्याचे दिसून येते. अशा स्थितीत प्रश्न पडतो की, जर एखादी व्यक्ती आपले बँक खाते दीर्घकाळ वापरत नसेल, तर ते किती दिवसांत बंद होते?
* व्यवहार न केल्यास खाते किती दिवसांत बंद होते ?
अलीकडच्या काही महिन्यांत खात्यातून कोणताही व्यवहार केला नाही ज्यामुळे खाते ‘इनऑपरेटिव्ह’ आहे किंवा बंद झाले असल्याची अनेक ग्राहक बँकेकडे तक्रार करतात. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तुमचे कोणत्याही बँकेत खाते आहे आणि काही कारणास्तव तुम्ही दोन वर्षांहून अधिक काळ व्यवहार करत नसाल तर तुमचे खाते बँकेद्वारे निष्क्रिय केले जाते. खाते निष्क्रिय केल्यानंतर तुम्ही खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकणार नाही. मात्र, लक्षात घ्या की निष्क्रिय खात्यात जमा रक्कम तशीच राहील आणि कालांतराने बँक त्यावर नियमित व्याज देत राहील.
* निष्क्रिय खाते पुन्हा सुरू कसे करावे ?
कोणतेही निष्क्रिय खाते पुन्हा नियमित खात्यात सहजपणे रूपांतरित केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन KYC करून घ्यावे लागेल आणि त्यासाठी पॅन, आधार यासारखी महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतील. तसेच संयुक्त खाते असल्यास दोन्ही खातेधारकांना केवायसी कागदपत्रे सादर करावी लागतील.
मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…
पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
This website uses cookies.