महाबुलेटीन न्युज
चाकण : वाकी खुर्द गावात वीज अटकाव यंत्रणेची उभारनी सरपंच नंदकुमार मलिभाऊ जाधव व उपसरपंच योगिताताई निलेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.
गावात वीज अटकाव यंत्रणा उभी केल्याने पावसाळ्यात पडणाऱ्या विजे पासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी फायदा होणार आहे. विज अटकाव यंत्रणेपासून सुमारे आठशे मिटर परिसरात पडणाऱ्या विजेचा अटकाव होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
गावात आणि परीसरातील वस्त्यावर विजेमुळे होणारी मनुष्य व वित्तहाणी टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याने महाराष्ट्र शासनाला ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार वाकी खुर्द गावात वीज अटकाव केंद्र उभारण्यात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी सरपंच नंदकुमार मलिभाऊ जाधव, उपसरपंच योगिताताई निलेश जाधव, सदस्य संतोष मारुती वहिले, मंगलताई नंदकुमार जाधव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बच्चे सर, तसेच यंत्रणा बसविणारे शरद मालपोटे, संदीप गारवे तसेच तंटामुक्ती उपाध्यक्ष अॅड. निलेश नानाभाऊ जाधव, नितीन गायकवाड, अमोल वहिले, अवधूत पाटिल आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
००००
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.