महाबुलेटीन न्यूज । नाजीम इनामदार
राजगुरुनगर : येथील सुप्रसिद्ध संगम क्लॉथ सेंटर या कापड दुकानाला आज संध्याकाळी ४-३० च्या सुमारास मोठी आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दुकानातील लाखो रुपये किंमतीच्या मालाचे नुकसान झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नावाजलेले संगम क्लॉथ सेंटर या पाच मजली कापड दुकानाला आज ( दि. ७ जुलै ) साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग दुकानातील दुरूस्तीचे काम चालू असताना लागल्याचे प्राथमिक रित्या समजते. दुकानात मोठ्या प्रमाणात कापड असल्याने या आगीने लागलीच उग्र रूप धारण केले व संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. आग आटोक्यात आणण्यासाठी घटना स्थळी राजगुरुनगर नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) अग्निशामक दलाच्या गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. आगीने उग्र रूप धारण केल्याने पुण्याहून अग्निशामक गाडी मागविण्यात आली. या दरम्यान स्थानिक तरुणांनी मदत कार्य साठी हातभार लावला होता. मात्र आग लागल्याची बातमी शोशल मीडियावर पसरताच राजगुरु
नगर मधील नागरिकानी मोठी गर्दी केली होती. उत्साही नागरिकांनी दृश्य टिपण्यासाठी मोबाईल समोर केले. त्यामुळे मदत कार्यास मोठे अडथळा निर्माण झाले. पोलिसांची नागरिकांना घटना स्थळापासून दूर थांबण्याचे आवाहन करावे लागले. तरी देखील नागरिक आवाहनाकडे दुर्लक्ष करुन गर्दी करीत राहिले. पोलिसांची ज्यादा कुमक मागवुन दोन्ही बाजुचे रस्ते रोखुन धरण्यात आले. अग्नि शामक दल प्रयत्न करूनही सुमारे तीन तास ही आग धूमसतच राहिली.
—–
● राजगुरूनगर-वाडा रस्त्यावरील संगम कपडाच्या दुकानासमोरच पुरातत्व खात्या अंतर्गत असलेला पुरातन वास्तु असून या वास्तु भोवतील परिसरात कोणतेही बांधकाम करताना या खात्याची परवानगी घ्यावी लागते.
● लॉकडाउन काळात अत्यावश्यक दुकाने वगळता येथील सर्व कापड दुकाने सर्रास उघडी असतात. प्रशानाने कारवाई करून ही काहीच फरक पडत नाही.
००००
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.