महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
रोहा ( रायगड ) : नवीन सोष्टे हे रायगड जिल्ह्यातील वरिष्ठ आणि वयोवृद्ध पत्रकार.. आयुष्यभर फक्त पत्रकारिताच केली.. संवेदनशील मनाचे आणि सामाजिक बांधिलकी जपणारया नवीन सोष्टे यांनी रायगड जिल्ह्यातील अनेक प्रश्न धसास लावले.. ज्या काळात कोकणात पत्रकारिता विकसित झालेली नव्हती त्या काळात त्यांनी गरीब, वंचित उपेक्षितांचा आवाज बणून लोकांना न्याय मिळवून दिला.. विविध सामाजिक संघटनांशी जोडले गेलेले नवीन सोष्टे रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पाच वर्षे अध्यक्ष होते.. 1989 मध्ये अंबा नदीला आलेल्या महापुराचे नागोठणे वाहून गेले.. स्वतः नवीन सोष्टे यांचेही सर्वस्व गेले .. कागदपत्रे वाहून गेली.. या दुर्घटनेवर त्यांचे “अंबा काठचे अश्रू” हे पुस्तक प़चंड गाजले.. स्वतःच्या दुःखाचे भांडवल न करता तटस्थ भूमिकेतून त्यांनी महापुराचे विश्लेषण केले.. आणि जे चुकले त्यांच्यावर कठोर प़हार केले.. सिद्धहस्त लेखक लेखक असलेल्या सोष्ठे यांची 16 पुस्तके प्रसिद्ध आहेत.. यातील बहुतेक पुस्तकं पत्रकारितेशी संबंधित आहेत.. नवीन सोष्टे यांना मी 1994 पासून मी तर ओळखतोच कारण ते माझे वार्ताहर होते..पण माहिती महासंचालक दिलीप पांढरपट्टे आणि माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे त्यांना चांगले ओळखतात.. ते रोहा तालुक्यातील पत्रकार आहेत.. मराठी पत्रकार परिषदेसह विविध पुरस्कारांनी नवीन सोष्टे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे..
नवीन सोष्टे पुराण यासाठी येथे कथन केले आहे की, त्यांना माहिती आणि जनसंपर्क विभागाने पेन्शन नाकारली आहे.. त्याचे जे कारण दिले आहे त्यावरून ऐकीव गोष्टीवरून ज्येष्ठांची कशी अडवणूक आणि अपमान केला जात हे समोर येते.. नवीन सोष्टे हे सरकारी नोकरीत होते असे कारण देत त्यांचा अर्ज नाकारला गेला आहे.. वास्तव असे की त्यांनी एक दिवस देखील सरकारी नोकरी केलेली नाही.. सरकारी नोकरीत होते ते बिपीन नारायण सोष्टे.. नवीन सोष्टे यांचे सख्ये बंधू.. दोघे दिसायला सारखे असल्याने पत्रकार सोष्टे हेच सरकारी नोकरीत होते असा समज करून घेत त्यांची अडवणूक केली जात आहे. हतबल, विकलांग झालेल्या आणि औषधी घेण्यासाठी देखील दमडी नसलेल्या नवीन सोष्टे यांचा काल मला फोन आला आणि त्यांनी आपल्यावर कसा अन्याय केला जात आहे हे विस्ताराने विषद केले..जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेल्या, विविध संस्था चालविणारे आणि दोन दोन पेन्शन घेणाऱ्यांना तत्परतेने पेन्शन मंजूर करणाऱ्या माहिती विभागाला नवीन सोष्टे यांचे वावडे का? हे कळत नाही.. 40-45 वर्षे आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकांवरील अन्यायाला वाचा फोडणारे नवीन सोष्टे आज स्वतःच न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.. हा न्याय त्यांना मिळेल? माहिती नाही.. ( क्रमशः )
— एस.एम.देशमुख ( मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद )
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.